28.1 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारणसिद्धरामय्या यांनी मुलासाठी मंत्रिमंडळात मागितले स्थान?

सिद्धरामय्या यांनी मुलासाठी मंत्रिमंडळात मागितले स्थान?

कर्नाटकमध्ये सत्तांतराची प्रक्रिया वेगात

Google News Follow

कर्नाटकमध्ये सत्तांतराची प्रक्रिया वेगाने सुरू असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी स्वीकारल्यानंतर आणि राज्य मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्व नवीन सरकारच्या स्थापनेला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (३० मे) सायंकाळी ४ वाजता बेंगळुरूतील विधान सौधाच्या परिषद सभागृहात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नव्या नेत्याची निवड होणार आहे.

माहितीनुसार, सिद्धरामय्या यांनी आगामी डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्या मुलाला मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचे अध्यक्षपद स्वतः सिद्धरामय्या भूषवणार आहेत. या बैठकीत डीके शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असून, त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याची आणि मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू होईल.

राजीनामा दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धरामय्या आपल्या पुत्र यतींद्र यांच्यासह नवी दिल्लीत गेले आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ यांची भेट घेतली. सूत्रांच्या मते, मंत्रिमंडळात समाविष्ट करावयाच्या आपल्या पसंतीच्या नेत्यांची यादी सिद्धरामय्या यांनी अद्याप अंतिम केलेली नाही. शनिवारी सीएलपी बैठकीदरम्यान ते ही यादी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यसभेवर पाठविण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच नाकारला आहे. राष्ट्रीय राजकारणात भूमिका घेण्याऐवजी कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय राहण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. यानंतर सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. बैठकीनंतर खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर छायाचित्रे शेअर करत सिद्धरामय्या यांच्या राजकीय योगदानाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “सिद्धरामय्या यांचे सार्वजनिक जीवन नेहमीच सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि लोकहिताच्या बांधिलकीचे प्रतीक राहिले आहे. सामान्य कुटुंबातून येऊन दोन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांनी समानता, सामाजिक सलोखा आणि वंचितांच्या कल्याणासाठी सातत्याने काम केले.”

हे ही वाचा:

आशिया- प्रशांत महासागरावर कोणतेही राष्ट्र वर्चस्व गाजवू शकत नाही!

कर्नाटकात २० लाख बेकायदा बांगलादेशी?

लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यात ११ जण ठार

“ट्रम्प यांचे दावे म्हणजे सत्य आणि असत्याचे मिश्रण”

नव्या कर्नाटक मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळू शकते. राज्यसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेवर बोलताना शिवकुमार यांनी सांगितले की, यासंदर्भातील चर्चा पूर्ण झाली असून योग्य वेळी पक्ष नेतृत्व नावे जाहीर करेल. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारले असता शिवकुमार म्हणाले, “काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता नेमका कधी निवडला जाईल, याबाबत मला माहिती नाही.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा