29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसंसदीय अधिवेशनाआधी विदेश दौऱ्यांची भानगड काय? |

संसदीय अधिवेशनाआधी विदेश दौऱ्यांची भानगड काय? |

Related

सदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा देशाबाहेर चालले आहेत. संसदीय अधिवेशनाआधी विदेशावर जाण्याबाबत राहुल गांधींनी कमालीचे सातत्य दाखवले आहे. १६ ते १९ नोव्हेंबर त्यांचा अमेरिका दौरा आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विदेश दौरे हे भारतीयांना न उलगडलेले गुढ आहे. केंद्र सरकारला कदाचित ते उलगडलेले असावे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे संकेत दिले. गुजरातेतील एका जाहीर सभेत त्यांनी या संदर्भात काही सूचक वक्तव्ये केली आहेत. मोदी हे गुढ उकलणार की फक्त पडदा उचलल्यासारखे करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे! रामलीला मैदानात इंडिया आघाडीची सभा साफ कोसळली. ४० टक्के रामलीला मैदानावर केवळ चिखल होता; उरलेल्या भागात मांडलेल्या खुर्च्याही भरल्या नव्हत्या. परंतु काँग्रेस नेत्यांनी मात्र सभेला अभूतपूर्व गर्दी लोटल्याचा दावा केला. हे दाखवायचे दात होते. प्रत्यक्षात सभेचा फ्लॉप शो झाल्यामुळे काँग्रेस नेते चवताळले आहेत. सभेला दांडी मारल्याबद्दल पक्षाध्यक्षांनी काँग्रेसच्या ८३ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. युवक काँग्रेसच्या २०० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सभा प्रचंड यशस्वी कऱण्याचे हे असले बक्षीस सर्वसामान्यांना कळण्याच्या पलिकडचे आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा