28.9 C
Mumbai
Thursday, July 9, 2026
घरक्राईमनामादहिसरमध्ये दुधात पाणी मिसळून ब्रँडेड पॅकेट विकले, एकाला अटक

दहिसरमध्ये दुधात पाणी मिसळून ब्रँडेड पॅकेट विकले, एकाला अटक

मुंबईत बनावट दुधाचा काळाबाजार उघड

Google News Follow

Related

सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१२ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लिंगय्या गंटा (वय ४२) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, विविध ब्रँडचे दूध पॅकेट आणि बनावट दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दहिसर (पूर्व) येथील दुबे चाळ परिसरातील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी बनावट दूध तयार करत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. तपासात धक्कादायक बाब समोर आली. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसाय करत होता. तो नामांकित कंपन्यांच्या दूध पॅकेटच्या कडा काळजीपूर्वक कापून त्यातील जवळपास निम्मे दूध काढून घेत असे. त्यानंतर त्या जागी दूषित पाणी भरून पॅकेट पुन्हा सील केले जात होते. त्यामुळे पॅकेट बाहेरून पूर्णपणे अस्सल असल्याचा भास होत होता.
हे ही वाचा:
IPOपूर्वी ऋतिक रोशनचा मोठी शेअर डील!

लेप्टोस्पायरोसिसपासून बचावासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ऍडव्हायझरी

रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला ‘हनीमून बेडरूम’चा लूक

विषारी कीटक चावल्याने अभिनेते राजेश शर्मांना गंभीर संसर्ग

हे भेसळयुक्त दूध दहिसर आणि आसपासच्या परिसरातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये मूळ ब्रँडच्या नावानेच पुरवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच मुंबईतील कोणकोणत्या भागात भेसळयुक्त दूध पुरवले जात होते, याचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा