मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सगळे उमेदवार प्रचारात उतरले आहेत. प्रचाराचा धुरळा आता उडाला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस राहिले असल्यामुळे आपल्या प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत.
प्रभाग क्रमांक ८४ च्या भाजप शिवसेना रिपाईच्या उमेदवार अंजली अभिजित सामंत यांनीही आपल्या प्रचारात मुसंडी मारली आहे. आपल्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रभाग पिंजून काढला आहे.
हे ही वाचा:
PSLV- C62 च्या अपयशानंतर PSLV- C61 ची आठवण का झाली?
फडणवीसांनी व्हीडिओ, फोटो दाखवत राज ठाकरेंवर केला प्रहार
“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”
जर्मनीमार्गे दुसऱ्या देशात आता बिनधास्त जा!
त्यांनी आपल्या प्रभागातील लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतले आहे. लोकांकडूनही त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आपलेसे केले आहे. एक सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून अंजली सामंत यांची ओळख आहे.
