‘अफझल खान वध सहन न झाल्यानेच आव्हाड यांनी चित्रपट बंद पाडला’

आमदार अतुल भातखळकर यांची टीका

‘अफझल खान वध सहन न झाल्यानेच आव्हाड यांनी चित्रपट बंद पाडला’

हर हर महादेव या चित्रपटावरून सध्या महाराष्ट्रात राडा सुरू असून अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेडकडून चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. ठाण्यातही अशाच एका शोदरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपट पाहण्यास आलेल्या प्रेक्षकाचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला हे चित्र दाखविण्यात आले म्हणूनच जितेंद्र आव्हाड यांनी हा चित्रपट बंद पाडला. त्यामुळे राष्ट्रीय भावनांना ठेच पोहोचवलेली आहे. त्याबद्दल त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. केवळ मारहाणीचा गुन्हा नको तर राष्ट्रप्रेमी भावना दुखावल्या म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी भाजपाची मागणी आहे.

हे ही वाचा:

मुंबई-ठाण्यादरम्यान उभी राहणार सिनेसृष्टी

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

 

आमदार भातखळकर पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा राष्ट्रभक्तीचे विषय येतात तेव्हा जितेंद्र आव्हाड त्याला विरोध करतात त्या अनुषंगाने आव्हाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

जितेंद्र आव्हाड यांनी ही स्टंटबाजी करण्यामागील खरे कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा हर हर महादेव या चित्रपटामुळे बिथरला आहे. जितेंद्र आव्हाड यांना असा इतिहास नको आहे. एवढेच नव्हे तर आव्हाड यांनी कायदाही हातात घेतला.

हर हर महादेव चित्रपटातील प्रसंग इतिहासाला धरून नाहीत, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे शो बंद केलेच पण प्रेक्षकांनाही दमदाटी केली आणि त्यांना चित्रपटगृहातून हुसकावून लावल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

Exit mobile version