भूपेन बोराह यांचा आसाम काँग्रेसला टाटा, बाय बाय

भाजपात प्रवेश करण्याची शक्यता, पक्ष नेतृत्वावर नाराज

भूपेन बोराह यांचा आसाम काँग्रेसला टाटा, बाय बाय

आसाममध्ये आता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार असून यादरम्यान राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गोगोई सरकारच्या सलग दोन कार्यकाळात त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते आणि २००१ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

भूपेन बोराह म्हणाले की, त्यांनी हा निर्णय स्वाभिमानामुळे घेतला. त्यांनी लिहिले की, ही स्वाभिमानाची बाब आहे. मी केंद्रीय नेतृत्वासमोरही माझ्या चिंता मांडल्या आहेत. जर पक्ष असाच चालू राहिला तर त्याचे भविष्य काय असेल? असे मानले जाते की त्यांचा खासदार रकीबूर हुसेन यांच्याशी वाद झाला होता आणि या मुद्द्द्यावरून ते पक्षावर नाराज होते. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बोराह यांनी लिहिले आहे की पक्ष नेतृत्वाकडून त्यांना “दुर्लक्ष” केले जात आहे आणि राज्य युनिटमध्ये त्यांचे हक्क दिले जात नाहीत.

हे ही वाचा:

आरबीआयच्या कडक कर्ज नियमांचा शेअर बाजाराला फटका

चीनच्या सिचुआनमध्ये अण्वस्त्र सुविधांचा होतोय विस्तार

महाशिवरात्रीनिमित्त इशा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात तमन्ना भाटियाने धरला ठेका

एसआयआरमध्ये घोळ; बंगालमध्ये सात अधिकाऱ्यांना हाकलले

बोरा यांनी जवळजवळ पाच वर्षे आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. २०१६ मध्ये त्यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून आले, त्यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपत होता. २०२२ मध्ये ते काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. तथापि, २०२४ मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले. भूपेन बोराह यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा आणि गौरव गोगोई यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री हिमंता यांच्यावर १,००० बिघा जमीन असल्याचा आरोप होता. सर्मा यांनी गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला.

Exit mobile version