मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आता सगळे पक्ष प्रचाराला लागले आहेत. विविध ठिकाणी पक्षांचे नेते प्रचार करत आहेत. अनेक उमेदवारांनी आपापली पक्षकार्यालये स्थापन करून त्यामाध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्ते हे कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करत राहिले आणि त्यांच्या या निस्वार्थ कामाची दखल घेत त्यांना उमेदवारी मिळाली. भाजपाचे संजय कांबळे हे असेच एक उमेदवार.
हे ही वाचा:
कोणतीही अपेक्षा न बाळगता पक्षासाठी काम करणारे हजारो, लाखो कार्यकर्त्यांपैकी एक संजय कांबळे. वॉर्ड क्रमांक ४५ मधून ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या संजय नामदेव कांबळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते पार पडले. त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अतुल भातखळकर यांनी केले आहे.
