“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवे नाट्य पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. पण या धमक्यानानंतर भाजपा नेते आणखीनच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. एका भाजपा नेत्याने तर शिवसेनेला खुले आव्हान देऊन हिम्मत असेल तर फोन करा असे सांगितले आहे.

राज्यातील पूजा चव्हाण प्रकरण दिवसेंदिवस खूपच नाट्यमय वळणे घेत आहे. शिवसेना नेते आणि राज्य सरकार मधील मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात येत असल्यामुळे विरोधी पक्ष भाजपा पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात आक्रमक आहे. पण यावरूनच आता भाजपा नेत्यांना धमक्या येत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.पण धमक्या देणाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटताना दिसात आहे, कारण या धमक्यांनंतर भाजपा नेते आणखीनच आक्रमक झाले आहेत. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी धमक्यांबद्दल ट्विट केले आहे. पण याच ट्विटमध्ये आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असे म्हणत त्या गुंडाना चांगलेच धारेवर धरले आहे.

हे ही वाचा:

“अशा धमक्यांना भीक घालणार नाही” – अतूल भातखळकर

शिवसेने विरोधात कायमच आक्रमक असणारे भाजपा आमदार नितेश राणे हे आपल्या सहकाऱ्यांना येणाऱ्या या धमक्यांवरून चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विट करत शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले आहे. “आमच्या सहकार्यांना धमकीचे फोन येत आहेत… एखादा फोन मलाही टाका ना…मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे.” असे ट्विट करत राणे यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे.

Exit mobile version