‘नजर हटी दुर्घटना घटी’

‘नजर हटी दुर्घटना घटी’

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणूक पार पडली. दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले, विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे अनेक आमदार गेले असून, त्यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. यावरून शिवसेनेवर अनेक टीका होत आहेत.

अचानक शिवसेनेचे इतके आमदार बंडखोर होऊन महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ” नजर हटी दुर्घटना घटी, त्यांनतर गुवाहाटी, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या नावावर दावा करणार , अशा चर्चा सुरु आहेत. त्यावरून सुद्धा निलेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेची नेहमीची घोषणा “बोल ही मुंबई कोणाची” म्हणत म्हणत “बोल ही शिवसेना कोणाची” विचारायची परिस्थिती आली आहे, अशी टीका यावेळी राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते…शिवसेनेच्या आमदारांनी लिहिले पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

शिवसेनेकडे उरले फक्त १४ आमदार

एकनाथ शिंदेंसोबत ४० हुन अधिक आमदार प्रथम सुरत त्यांनतर गुवाहाटी दाखल झाले. दरम्यान, राज्यात घडलेल्या या मोठ्या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेनेचे एवढे आमदार, मंत्री रातोरात निघाले, इतकं मोठं बंड करण्यात आलं, हे कळलं कसं नाही. एवढं सगळं होत असताना तुम्हाला समजलं कसं नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत.

Exit mobile version