मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय

रेखा चौधरींना विरोधक नाही

मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवार निश्चित होत आहेत तसेच ते अर्ज भरत आहेत. ३० डिसेंबर हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक उमेदवार नाराज आहेत. काही उमेदवार नाराज आहेत तर काही बंडखोरी करत आहेत. अशातच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाल्याची बातमी आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी बिनविरोध विजयी झाल्या आहेत. 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. उद्या कागदपत्र पडताळणी होणार असून त्यानंतर विजयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

२०२६ मध्ये मजबूत राहील भारतीय शेअर बाजार

भारत ठरला जगातील चौथी अर्थव्यवस्था

नितीन चौहान यांनी अर्ज भरला; कांदिवलीतील ठाकूर पर्व संपले

दीप्ती शर्मा अव्वल स्थानावर कायम, शेफाली वर्मा आणि ऋचा घोषची मोठी झेप

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीआघीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय आहे अशी भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

रेखा राजन चौधरी या भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आता कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने खाते उघडले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आता 31 तारखेला कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version