‘विलिनीकरणाची चर्चा भाजपाला सांगितल्याशिवाय झालीच नसती!’

‘विलिनीकरणाची चर्चा भाजपाला सांगितल्याशिवाय झालीच नसती!’

अजित पवार जर विलिनीकरणाची चर्चा करत होते, तर ती भाजपशी चर्चा केल्याशिवाय, त्यांनी केलीच नसती. विलिनीकरण करायचे अथवा नाही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा निर्णय आहे पण त्यासाठी भाजपाशी चर्चा करावीच लागेल आणि ती केली जाते, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर विलिनीकरण होणार होते, १२ फेब्रवारीला विलिनीकरणाची घोषणा केली जाणार होती, असे दावे केले जात आहेत. पण प्रत्यक्षात याचा कोणताही पुरावा नाही. अजित पवार याची साक्ष द्यायला आज हयात नाहीत. मात्र त्यांच्या नावावर अनेक दावे विविध राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत. त्यावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.

फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी आम्ही तासभर बोलत होतो. पण त्यावेळीही विलिनीकरणाविषयी कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. जर विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर त्याविषयी अजित पवारांकडून आम्हाला नक्कीच सांगितले गेले असते. अजित पवार जर विलिनीकरणाचा निर्णय घेणार होते तर ते काय एनडीए सरकारमधून बाहेर पडणार होते का? ते तर सरकारमध्ये पूर्णपणे स्थिर होते. त्यामुळे एक इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन पसरवायचं हे योग्य नाही.

हे ही वाचा:

“ममता बॅनर्जींच्या आदेशावरून हिंदूविरोधी टिप्पणी केली”

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; पुण्यात सापडले ५ संशयित

अर्थसंकल्पाच्याच वेळी सेन्सेक्स १५०० अंकानी कोसळला

भारतातील ‘ग्रोथ शहरां’ना जोडण्यासाठी सात हाय- स्पीड रेल कॉरिडोर

यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती आणि १२ फेब्रुवारीला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता.

Exit mobile version