28 C
Mumbai
Thursday, April 23, 2026
घरसंपादकीयट्रम्प यांना पाकिस्तानची मध्यस्थी का हवी? त्याचा अखेर उघडा झाला!

ट्रम्प यांना पाकिस्तानची मध्यस्थी का हवी? त्याचा अखेर उघडा झाला!

Google News Follow

Related

युद्धबंदीची दोन आठवड्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीनुसार नवी युद्धबंदी जाहीर केली आहे. या युद्धबंदीसाठी त्यांनी तारखेचे बंधन ठेवलेले नाही. इराणकडून प्रस्ताव येईपर्यंत किंवा काही तोडगा निघेपर्यंत युद्धबंदी सुरू राहील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ही घोषणा जगात कोणीही गंभीरपणे घेताना दिसत नाही. इराणही नाही. ट्रम्प यांच्या घोषणेची ही तर शरणागती, असल्याची खिल्ली इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने उडवली आहे. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर होर्मुझमध्ये इराणने एका जहाजावर गोळीबार केला. होर्मुझमध्ये इराणची नाकेबंदी जारी आहे. अमेरिकेचे ब्लॉकेडही सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता दुहेरी पेचात सापडले आहेत.

अमेरिकेच्या घटनेनुसार युद्ध सुरू करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना सिनेटच्या मंजुरीची गरज नसली तरी ६० दिवसांच्या पलिकडे युद्ध सुरू राहील्यास ही परवानगी घ्यावी लागते. ती न मिळाल्यास, पुढील ३० दिवसांत सैन्य मागे घ्यावे लागते. युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. १ मे रोजी ६० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर ट्रम्प यांना सिनेट आणि काँग्रेसची मंजूरी घ्यावी लागणार. हे ट्रम्प यांना जड जाण्याची शक्यता आहे. कारण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असले तरी युद्धाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन पक्षातच फुट पडली आहे. त्यामुळे ही मंजुरी घेणे ट्रम्प यांच्यासाठी सोपे नाही.

ट्रम्प पाकिस्तानला या प्रकरणात पुढे पुढे का करतायत, याचा उलगडा अनेकांना होत नाही. असा देश ज्याची जगात प्रतिष्ठा नाही. अर्थकारण डबघाईला आलेले. दहशतवादी कारवायांमुळे प्रतिमा डागाळलेली. अशा देशाच्या नेत्यांना ट्रम्प मध्यस्त म्हणून पुढे का करतायत, हे कोणालाच समजत नव्हते. युद्धबंदीच्या ताज्या घोषणेनंतर याचा खुलासा झाला आहे. त्यांनी पाकिस्तानला विनंती करण्यासाठी ठेवले आहे. जेव्हा ट्रम्प यांना गरज असेल तेव्हा ते पाकिस्तानला पुढे करणार. म्हणजे ट्रम्प यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला, असे म्हणायला जगाला वाव नाही. त्यांच्या सांगण्यावरून हल्ले थांबवले असे जाहीर करण्यासाठी पाकिस्तान त्यांना हवा होता. जो पर्यंत त्यांचा प्रस्ताव येत नाही किंवा तोडगा निघत नाही, तोपर्यंत ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केलेला आहे.

हे ही वाचा:

पाण्याचा जपून वापर करा; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जींच्या कृतीवर तीव्र नाराजी

दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीच्या विळख्यात कराची

इराणने होर्मुझमध्ये दोन जहाजे केली जप्त

म्हणजे इराणचा प्रस्ताव नाही आला तरी युद्धबंदी जारी राहणार आहे. कारण ती ट्रम्प यांची गरज आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव म्हणजे शरणागतीच आहे. एका बाजूला ब्लॉकेड सुरू ठेवायचे, हाच मुळात युद्धबंदीचा भंग आहे. अमेरिकेचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे, असे ते म्हणाले. इराणच्या संसेदेचे अध्यत्र मोहमद बघेर गालीबाफ यांनीही वाटाघाटी आणि ब्लॉकेड एकाच वेळी चालू शकत नाही, अशी टीका केली आहे.

आयआरजीने तर आधीच जाहीर केले आहे, अमेरिकेने जर युद्ध सुरू केले तर आखातातील तेल उद्योगाला आम्ही नष्ट करू.
आम्ही कोणालाही युद्धबंदीच्या मुदतवाढीची विनंती केलेली नाही, असे बघई यांनी परखडपणे सांगितले आहे. याचा अर्थ असा की इराण पेक्षा ट्रम्प या युद्धबंदीसाठी उत्सुक आहेत. इराणची कशी दुरावस्था झाली आहे, याबाबत ट्रम्प वारंवार बोलत असले तरी ट्रम्प यांची राजकीय दुरावस्था जास्त दिसते आहे. हे युद्ध अर्धवट सोडून ट्रम्प विजयाचे ढोल वाजवत आहेत. प्रत्यक्षात इराणचे युरेनियम अजून त्यांच्याचकडे आहे. इराणने शरणागती पत्करलेली नाही. इराणमध्ये अयातुल्ला यांचा पुत्र मुज्तबा गादीवर बसला आहे. इराणची लष्करी क्षमताही ट्रम्प यांना पुरती मोडीत काढता आलेली नाही. अजूनही अमेरिकेला आश्चर्याचे धक्के देण्याची त्यांची क्षमता आहे.

ट्रम्प हे खोटारडे आहे, ते वारंवार शब्द फिरवतात. भूमिका बदलतात, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, असे इराणचे नेते जाहीरपणे सांगतायत. त्यामुळे हे युद्ध सुरू करून ट्रम्प यांनी साधले काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या कृपेमुळे होर्मुझमध्ये एक नवा टोल नाका सुरू झालेला आहे. जिथे जगाला प्रति जहाज २० दशलक्ष डॉलरचा टोल दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

सिनेटने मंजुरी दिली नाही तर युद्ध बंद करायचे आणि ब्लॉकेड मात्र सुरू ठेवायचा, अशी ट्रम्प यांची योजना दिसते आहे. इराणला सुद्धा तिच शक्यता वाटत असल्यामुळे ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केल्यानंतर इराणने एका व्यापारी जहाजावर हल्ला चढवला. ट्रम्प यांनी ब्लॉकेड कायम ठेवला तर हे वारंवार होणार आहे. ट्रम्प यांना इराणला ठोकून काढायचे होते. परंतु त्यांच्या हाणामारीत जगाच्या अर्थकारणाचे बारा वाजले. जगाचा इंधन पुरवठा विस्कळीत झाला.

युद्धविरामाचा फायदा घेऊन सज्जता वाढवण्याचे काम सुरू आहे, अशी भीती दोन्ही बाजूंना वाटते आहे. जगाच्या अर्थकारणचे धिरडे करून ट्रम्प जिंकलो रे… अशी घोषणा करून पाठ थोपटतायत. असीम मुनीर आणि शाहबाज हे दोन जोकर शांतीदूत म्हणून पुनर्जन्म झाल्याच्या थाटात वावरतायत. हा तमाशा पाहून जगाने मात्र कपाळाला हात लावलेला आहे. टाईम प्लीजचा हा खेळ अजून बराच काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा