29.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरस्पोर्ट्सविराटची पिन हरवली; पंचांना सापडली!

विराटची पिन हरवली; पंचांना सापडली!

Google News Follow

क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांची दांडी गुल करणारा विराट कोहली एका छोट्याशा पिनमुळे मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान विराटच्या हातातील घड्याळाचा पट्टा अचानक तुटला आणि पट्टा मैदानात पडला. विराटने पट्टा उचलला खरा; पण त्याला घड्याळाशी जोडणारी छोटीशी पिन मात्र काही केल्या सापडेना. आता पिन हरवल्यामुळे घड्याळाचा पट्टा जोडायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र विराटने त्यासाठी खेळ थांबवण्याऐवजी पुन्हा फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.

पण खरी गंमत पुढच्याच षटकात घडली! हरवलेली पिन पंचांच्या नजरेस पडली. पंचांनी ती उचलली आणि थेट विराटच्या स्वाधीन केली. पिन हातात पडताच विराटच्या चेहऱ्यावर जे हसू उमटले, ते पाहण्यासारखे होते. जणू काही हरवलेला खजिनाच पुन्हा मिळाला! विराटने ती छोटीशी पिन चाहत्यांना दाखवत आपला आनंदही व्यक्त केला. एरवी मैदानात प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणाऱ्या विराटला एका पिनने मात्र चांगलेच फिरवले. विशेष म्हणजे, पिन सापडल्याचा त्याचा आनंद पाहून चाहत्यांनाही हसू आवरले नाही.

आता सोशल मीडियावर विराटच्या या मजेशीर प्रसंगाची चर्चा रंगली आहे. घड्याळाचा पट्टा तुटला, पिन हरवली आणि पंचांनी ती शोधून दिली; पण या सगळ्या नाट्यात विराटची स्माईल मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून गेली. घड्याळ कितीही महागडे असो, त्याची छोटीशी पिन हरवली की मोठ्यांनाही शोधमोहीम राबवावीच लागते, हे विराटने दाखवून दिले!

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा