29.5 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपंजाबमध्ये पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होईल काय?

पंजाबमध्ये पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होईल काय?

Related

पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा हा पंजाबमध्ये कधीच प्रमुख पक्ष नव्हता. अकाली दलासोबत युती करून भाजपाने कायम पंजाबमध्ये दुय्यम भूमिका घेतली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मात्र सत्तेवर येण्यासाठी भाजपा नेते ताकद लावताना दिसत आहेत. पंजाब हे सीमावर्ती राज्य असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रग्जचा तरुणाईला पडलेला विळखा ही आज पंजाबमधील सगळ्यात ज्वलंत समस्या आहे. भाजपाने नेमका याच समस्येला हात घातला असून पंजाब ‘चिट्टा’ मुक्त करण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक समीकरणांची जुळवाजुळवही सुरू आहे. भाजपा २०२७ च्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का, राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपाची पंजाबमध्ये सत्ता येईल का, हा सध्या कळीचा प्रश्न आहे. २०२२ च्या निवडणुकीत ४२ टक्के मते घेऊन ‘आप’ हा सर्वात मोठा पक्ष बनला. ११७ पैकी ९२ जागा जिंकून आपने चमत्कार घडवला. त्या खालोखाल २३ टक्के मते आणि १८ जागा काँग्रेसला मिळाल्या. अकाली दलालाही १८ टक्के मते आणि तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या वाट्याला ६ टक्के मते आणि फक्त दोन जागा आल्या. अर्थात, २०२२ च्या आकडेवारीचा आधार घेतला तर भाजपा हा पंजाबमधील चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरतो. तरीही, भाजपा हा सत्तेच्या स्पर्धेत असल्याची वातावरण निर्मिती करण्यात भाजपाच्या नेत्यांना यश मिळाले आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंजाबच्या घडामोडींवर बारीक नजर आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा