पराभवानंतर मुंबई काँग्रेस मध्ये जुंपली

भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

पराभवानंतर मुंबई काँग्रेस मध्ये जुंपली

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही नोटीस देण्यात आली असून, काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाई जगताप यांनी अलीकडेच माध्यमांसमोर बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा, अशी मागणी केल्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज झाले. पक्षातील मतभेद सार्वजनिकरित्या मांडणे चुकीचे असून त्यामुळे संघटनेची प्रतिमा खराब होते, असे काँग्रेस नेतृत्वाचे मत आहे.
हे ही वाचा :
इंडोनेशियात ११ प्रवाशांसह उड्डाण करणाऱ्या विमानाचा संपर्क तुटला

भारताकडून ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मोठी मंजुरी

रशियन तेलाच्या आयातीत मोठे बदल

दिल्ली हे खलिस्तानी, बांगलादेशस्थित दहशतवाद्यांचे लक्ष्य

AICC ने पाठवलेल्या नोटीसमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा प्रकारची विधाने पक्षाची एकजूट कमकुवत करतात. त्यामुळे भाई जगताप यांनी सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर समाधानकारक नसेल, तर पुढील शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये एकूण 227 नगरसेवकांची संख्या आहे. यामध्ये काँग्रेसने २४ जागांवर विजय प्राप्त केला आहे. सध्याच्या राजकीय समीकरणात काँग्रेसची ताकद मर्यादित असून, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला निवडणुकांमध्ये मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या नोटीसमुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होतील की नेतृत्व समेटाचा मार्ग काढेल, हे आता भाई जगताप यांच्या उत्तरावर अवलंबून आहे.

Exit mobile version