बिहारमध्ये किती आमदार जिंकले, हे राहुल गांधींना ठाऊकच नाही?

निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीचे वर्णन आले समोर

बिहारमध्ये किती आमदार जिंकले, हे राहुल गांधींना ठाऊकच नाही?

बिहारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यासंदर्भात आता काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मात्र आपले सहा आमदार निवडून आल्याचे राहुल गांधी यांना माहीतच नव्हते की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. त्या बैठकीत काय झाले, त्याचे वर्णन इंडिया टीव्हीवरील एका चर्चेत केले गेले.

त्या बैठकीत काँग्रेसचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे आपला राजीनामा घेऊन गेले. बिहार निवडणुकीतील पराभवाचे खापर आपल्यावर फुटण्यापूर्वी आपण राजीनामा देऊन मोकळे होऊ म्हणून ते तिथे राजीनामा पत्र घेऊन गेले. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपविला, पण त्यांनी तो राहुल गांधी यांच्याकडे देण्यास सांगितले. राहुल गांधींना तो दिल्यावर ते म्हणाले की, राहू दे नंतर बघू.

हे ही वाचा:

जीडीपी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत गतीचे प्रदर्शन

बाईक टॅक्सी चालकाच्या खात्यात सापडले ३३१ कोटी रुपये! पैसे आले कुठून?

दुपारी जेवणानंतर येणारी सुस्तीबद्दल वाचा..

राबडीदेवी केस : न्यायालयाने सीबीआय, ईडीला बजावली नोटीस

त्या बैठकीत राहुल गांधींनी विजयी झालेल्या उमेदवारांना बोलावले होते. तेव्हा ते सगळे उमेदवार त्या खोलीत एका सोफ्यावर बसले होते. त्यावर राहुल गांधी यांनी बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लवारू यांना विचारले की, सगळ्यांना बोलवा. तेव्हा कृष्णा अल्लवारू म्हणाले की, आपले सहाच उमेदवार जिंकले आहेत. एकाच सोफ्यावर सगळे बसलेले असल्यामुळे राहुल गांधींना वाटले की, आणखीही काही यायचे असतील. त्यानंतर कृष्णा अल्लवारू म्हणाले की, आपल्या पक्षाची बिहारमधील कामगिरी यावेळी खराब राहिली असली तरी २०१०च्या तुलनेत ती चांगली झाली आहे. तेव्हा आपले ४ आमदार निवडून आले होते आता ६ आले आहेत. त्यावर सगळ्या उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

राहुल गांधी यांना बिहारमध्ये किती आमदार जिंकले हे माहीत नव्हते, असेच यावरून दिसून येत होते.

 

Exit mobile version