महापौरांच्या दालनातूनच फाईल्स गायब! मुंबई महापालिकेतील वाझे कोण?

महापौरांच्या दालनातूनच फाईल्स गायब! मुंबई महापालिकेतील वाझे कोण?

शिवसेना शासित मुंबई महापालिकेतून काही महत्वाच्या फाईल्स गायब झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फाईल्स थेट महापौर यांच्या दालनातून गायब झाल्या आहेत. या फाईल्स डेंग्यू आणि मलेरियाची औषधे विकत घेण्या संदर्भातील आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
डेंग्यू आणि मलेरिया या आजारावरील औषधे विकत घेण्या संदर्भातील एक महत्त्वाची फाईल मुंबई महापालिकेकडे गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित होती. या फाईल संदर्भात गेल्या चौदा महिन्यात १८ वेळा रिमाइंडर पाठवण्यात आले. पण तरीदेखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कडून कोणतीही हालचाल या बाबतीत झाली नाही. अशातच ३० नोव्हेंबर रोजी ही फाईल महापौरांच्या दालनातूनच गायब झाल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुलुंड येथील आमदार मिहीर कोटेचा यांनी आपल्या ट्विटरद्वारे यासंदर्भातील गौप्यस्फोट केला.

हे ही वाचा:

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

चारपैकी मुख्यमंत्री परिवारातील दोन नेते घोटाळेबाजांमध्ये

मुंबई महापालिकेतील वसूलीकर वाझे कोण?
आमदार मिहीर कोटेचा यांनी या संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून मुंबई महापालिकेतील वसुलीकर वाझे शोधून काढावा अशी मागणी कोटेचा यांनी केली.

तर या संपूर्ण प्रकरणात भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या विषयात मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र डागण्यात आले आहे.

Exit mobile version