राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीपासून ते सरकार स्थापन करण्यापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची किंबहुना दुसऱ्या क्रमांकाची भूमिका बजावणारे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी आता सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
एलोन मस्क यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वरून जाहीर केलं की, त्यांचा विशेष सरकारी कर्मचारी म्हणून शासन कार्यक्षमता विभाग (DOGE) मध्ये असलेला कार्यकाळ संपत आहे. “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. DOGE चे ध्येय आता सरकारमध्ये संपूर्णपणे रुजेल, अशी मला खात्री आहे, असे एलोन मस्क यांनी म्हटले आहे. एका व्हाईट हाऊस अधिकाऱ्याने त्यांच्या निवृत्तीची पुष्टी केली असून ती प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे.
ट्रम्प यांच्यावर मस्क यांची नाराजी कशासाठी ?
राजीनाम्याच्या एक दिवस आधीच मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रमुख विधेयकावर टीका केली. त्यांनी ते “प्रचंड खर्चिक विधेयक” म्हणून वर्णन केलं आणि म्हटलं की, हे विधेयक DOGE चे कार्य कमजोर करत आहे. संघीय तूट वाढवणारं आहे. “विधेयक मोठं असू शकतं किंवा सुंदर, पण दोन्ही एकत्र शक्य नाही.”
हे ही वाचा:
बहुचर्चित अंकिता हत्याकांडाचा निकाल आज
१७ वर्षांची तहान… शेवटी RCB फाइनलमध्ये!
तीन संरक्षण सार्वजनिक उपक्रमांना ‘मिनीरत्न श्रेणी-१’ दर्जा
पाकिस्तानी एजंटला माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून तिघांना अटक!
ट्रम्प यांची प्रतिक्रिया, रिपब्लिकन पक्षात मतभेद
ट्रम्प यांनी मान्य केलं की विधेयकाच्या काही भागांवर त्यांनाही समाधान नाही, पण काही गोष्टींचा त्यांना “खूप आनंद” आहे. सेन. रॉन जॉन्सन (रिपब्लिकन, विस्कॉन्सिन) यांनी मस्क यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि विधेयक मंजूर होण्यात अडथळा येऊ शकतो असं सांगितलं. हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी सीनेटमध्ये फारसे बदल करू नयेत, असं आवाहन केलं.
DOGE चं पुढचं काम काय?
एलोन मस्क प्रशासनातून बाहेर पडले असले तरी DOGE चं मिशन सुरूच राहणार आहे:
व्हाईट हाऊसनं काँग्रेसकडे खर्च कपात प्रस्ताव पाठवला आहे, ज्यामध्ये, $1.1 अब्ज — कॉर्पोरेशन फॉर पब्लिक ब्रॉडकास्टिंग (NPR, PBS) साठी असलेला निधी, $8.3 अब्ज — परदेशी मदत कमी करण्याचं सुचवलं आहे. स्पीकर जॉन्सन यांनी म्हटलं, “DOGE च्या शिफारसींवर कारवाईसाठी हाऊस तयार आहे.”
मस्क पुन्हा Tesla आणि SpaceX मध्ये सक्रिय
मस्क यांनी सांगितलं की, ते आता पुन्हा त्यांच्या कंपन्यांमध्ये लक्ष केंद्रित करणार आहेत. “माझं राजकारणात खूप योगदान झालं आहे. आता पुरेसं आहे.” मस्क आता टेस्ला आणि सेप्सेक्स या कंपन्यात सक्रीय होतील.
