रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. गुरुवारी मुल्लांपूर येथे झालेल्या साखळी सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर आठ विकेट्सनी मात करत आठ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली.
पंजाबने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केवळ १४.१ षटकांत १०१ धावा करत संपूर्ण संघ बाद झाला. प्रत्युत्तरादाखल आरसीबीने १० षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावा करत विजय मिळवला.
आरसीबीसाठी फिल साल्ट याने आक्रमक अर्धशतक झळकावलं. त्याने २७ चेंडूंमध्ये ३ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदार याने केवळ ८ चेंडूंमध्ये १५ धावा करत षटकाराने सामना संपवला.
विराट कोहलीने १२ चेंडूंमध्ये १२ तर मयंक अग्रवालने १३ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या.
पंजाबच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यात अपयशच मिळवलं. पंजाबकडून काइल जैमिसन आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
गोलंदाजी करताना आरसीबीने शानदार कामगिरी केली.
जोश हेजलवुड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स,
यश दयाल याने २ विकेट्स,
तर भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पंजाबकडून मार्कस स्टॉयनिस याने सर्वाधिक २६ धावा,
तर प्रभसिमरन सिंग व अजमतुल्लाह ओमरजाई यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज दहाच्या घरात पोहोचू शकला नाही.
ही आरसीबीची चौथी अंतिम फेरी आहे. यापूर्वी संघाने २००९, २०११ आणि २०१६ साली अंतिम फेरी गाठली होती, मात्र प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा संघाकडे १७ वर्षांपासूनचा खिताबी दुष्काळ संपवण्याची मोठी संधी आहे.
