31.6 C
Mumbai
Sunday, June 7, 2026
घरस्पोर्ट्ससूर्यकुमारचे कर्णधारपद का गेले? तीन कारणे ठरली निर्णायक

सूर्यकुमारचे कर्णधारपद का गेले? तीन कारणे ठरली निर्णायक

Google News Follow

Related

टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व गमवावे लागले आहे. निवड समितीने आता श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली असून सूर्यकुमारला संघाबाहेरही बसावे लागले आहे. या मोठ्या निर्णयामागे तीन प्रमुख कारणे असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

१) खराब फॉर्म ठरला सर्वात मोठा अडथळा

कर्णधार म्हणून सूर्यकुमारने संघाला अनेक विजय मिळवून दिले, मात्र त्याची वैयक्तिक फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याने ४५ सामन्यांत ९३२ धावा केल्या. विशेषतः २०२५ मध्ये त्याची कामगिरी चिंताजनक राहिली. २० डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अवघ्या १३.८० च्या सरासरीने २२१ धावा केल्यामुळे त्याच्यावर टीका वाढत गेली.

२) भविष्यातील योजनांमध्ये बसला नाही

सूर्यकुमार यावर्षी ३६ वर्षांचा होणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आता २०२८ टी-२० विश्वचषक आणि ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून युवा नेतृत्व घडवण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळे दीर्घकालीन नियोजनात सूर्यकुमारपेक्षा तरुण पर्यायांवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

३) श्रेयस अय्यरचा वाढता प्रभाव

श्रेयस अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीनेही सूर्यकुमारवरील दबाव वाढवला.

  • आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद
  • आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जला अंतिम फेरीपर्यंत मजल
  • फलंदाज म्हणून सातत्यपूर्ण धावा
  • नेतृत्वगुणांची प्रभावी छाप

या सर्व बाबींमुळे निवडकर्त्यांचा विश्वास अय्यरकडे झुकला.

नवा अध्याय सुरू

सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक टी-२० फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र सध्याचा फॉर्म, वाढते वय आणि श्रेयस अय्यरची दमदार दावेदारी यामुळे त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थान गमवावे लागल्याचे चित्र आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
311,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा