30.8 C
Mumbai
Monday, June 8, 2026
घरराजकारण'महापौर असताना किशोरी पेडणेकरांनी केला टर्टल हॉटेल घोटाळा'

‘महापौर असताना किशोरी पेडणेकरांनी केला टर्टल हॉटेल घोटाळा’

शहाजीराजे क्रीडा संकुलातील कंत्राटाबाबत सोमय्यांचे आरोप

Google News Follow

Related

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकरांचा टर्टल घोटाळा अशा शब्दांत त्यांनी एक्सवर पोस्ट करत काही कागदपत्रे शेअर केली आहेत.

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मार्च २०२२ मध्ये महापौरपद संपत असताना, महापालिकेचा अंधेरी क्रीडा संकुलातील खेळाडूंसाठी असलेल्या ५४ खोल्यांचे हॉस्टेल “टर्टल हॉटेलला” ५ वर्षांसाठी दिले.

हे ही वाचा:

राजमिस्त्रीच्या लेकीची सुवर्ण झेप; आता ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न!

गिल-राहुलचे शतक, सुथारचा कहर! अफगाणिस्तान अडचणीत

भारतीय क्रिकेटमध्ये २५ वर्षांनंतर घडला असा पराक्रम

वरळीतील म्युझिक कॉन्सर्टनंतर महिलेची प्रकृती बिघडली

यासंदर्भात सोमय्या यांनी जी कागदपत्रे जोडली आहेत, त्यात २ मार्च २०२२ला महापौर असलेल्या किशोर पेडणेकर यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र दिले आहे. त्यात महापौर असलेल्या पेडणेकर यांच्या मंजुरीसाठी हे पत्र पाठविण्यात आले होते. त्यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्या पत्रात म्हटले होते की, शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी येथील २८ वसतीगृह खोल्यांचे नूतनीकरण करून त्या भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी मेसर्स युनायटेड मार्केट अँड रिसर्च ब्युरोला देण्यात य़ावे. त्यात म्हटले आहे की, या कंपनीला ३ वर्षांच्या कालावधीसाठी या खोल्या भाडेतत्त्वावर, ३ लाख आणि १८ टक्के वस्तू व सेवा कर आकारून विकसित करावी लागेल. त्यासाठी मंजुरी हवी आहे. हे पत्र बृहन्मुंबई क्रीडा व ललितकला प्रतिष्ठानच्या लेटरहेडवर आहे.

पण नंतर १ऑगस्ट २०२३मध्ये या ललितकला प्रतिष्ठानचे मुख्य लेखापाल रमाकांत सावंत यांचे पत्रही सोमय्या यांनी जोडले आहे. जे पत्र सावंत यांनी  मेसर्स युनायटेड मार्केट अँड रिसर्च ब्युरोचे प्रमुख धर्मेश शहा यांना लिहिले आहे. त्यात या संकुलातील सगळ्या खोल्या रिकाम्या कराव्या असा आदेश दिला आहे. त्या पत्रात ते पुढे म्हणतात की, तुम्ही या २८ खोल्या तातडीने रिकाम्या करा. तुम्ही टर्टल हॉटेल या नावाने थर्ड पार्टी ऍग्रिमेंट केलेले आहे. ते बेकायदा आहे. त्यामुळे या खोल्या ताबडतोब सोडाव्यात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा