38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरबिजनेसजागतिक अन्नधान्याच्या किमती चार वर्षांच्या उच्चांकावर

जागतिक अन्नधान्याच्या किमती चार वर्षांच्या उच्चांकावर

एल निनोचा अन्नबाजाराला फटका

Google News Follow

Related

जगभरातील अन्नधान्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून, हवामानातील बदल आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अन्नमहागाईचा दबाव वाढला आहे. प्रशांत महासागरातील हवामानातील बदलांमुळे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम गहू, साखर आणि इतर प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या अर्थात एफएओच्या फूड प्राइज इंडेक्समध्ये सप्टेंबर २०२६ मध्ये वाढ होऊन तो १३६ अंकांवर पोहोचला. जुलैमध्ये हा निर्देशांक १३१.१ अंकांवर होता. अवघ्या दोन महिन्यांत जवळपास पाच अंकांची वाढ झाली असून, सप्टेंबरमध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमती जवळपास चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या.
हे ही वाचा:
४४ वर्षांनी सुवर्ण जिंकले, ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले!

विमानतळावरील चोऱ्या सुरूच; केबिन क्रूच्या बॅगेतून दोन हजार डॉलर्स गायब

भारताला दिवसभरात सहा सुवर्णपदकं!

आरबीआयकडून रेपो दर वाढणार?

एल निनोच्या प्रभावामुळे जगातील अनेक भागांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याची भीती असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील पुरवठ्यावर आणि किमतींवर होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमती १८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या, तर गव्हाच्या वायदे किमती तीन वर्षांच्या उच्चांकावर गेल्या. विशेषतः गव्हाच्या जागतिक पुरवठ्यावर ब्लॅक सी परिसरातील परिस्थितीचा परिणाम होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे या महत्त्वाच्या व्यापारमार्गावरील वाहतूक आणि निर्यातीवर अडथळे निर्माण झाले असून, गहू आणि इतर कृषी उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत बाजारात चिंता वाढली आहे.

याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचाही अन्नमहागाईवर परिणाम होत आहे. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुझसह महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांवर दबाव निर्माण झाल्याने तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेल महागल्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम अखेरीस अन्नधान्याच्या किमतींवर होतो. त्यामुळे एकीकडे एल निनोमुळे उत्पादनावर दबाव, दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यातील अडथळे आणि त्यातच महागलेले कच्चे तेल, अशा तिहेरी संकटाचा सामना जागतिक अन्नबाजार करत आहे. या परिस्थितीमुळे आगामी काळात अन्नधान्याच्या किमती आणि जागतिक महागाईवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा