29.8 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्स४४ वर्षांनी सुवर्ण जिंकले, ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले!

४४ वर्षांनी सुवर्ण जिंकले, ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले!

Google News Follow

Related

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनचा १-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तब्बल ४४ वर्षांनंतर भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदक जिंकले.

भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरली लालरेम्सियामी. आपल्या २००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना तिने सामन्याच्या १०व्या मिनिटाला निर्णायक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय बचावफळीने चीनच्या प्रत्येक आक्रमणाचा समर्थपणे सामना केला.

चीनला दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मात्र भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पूनियाने अप्रतिम बचाव करत चीनला बरोबरी साधू दिली नाही. कर्णधार सलीमा टेटे दुखापतीनंतर मैदानात परतली आणि संघाने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम राखली.

भारताने यापूर्वी १९८२ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर १९९८ मध्ये रौप्य आणि २०१८ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र सुवर्णासाठी भारताला ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

या सुवर्णविजयासोबतच भारतीय महिला हॉकी संघाने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा