29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरक्राईमनामाप्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देत दांपत्याला लुटले

प्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देत दांपत्याला लुटले

५९ वर्षीय महिला आरोपीला अटक

Google News Follow

रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे एका दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे. कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दांपत्याला एका महिलेने प्रसाद असल्याचे सांगून गुंगीकारक पदार्थ मिसळलेली चिक्की खायला दिली. चिक्की खाल्ल्यानंतर काही वेळातच पती-पत्नीला गुंगी येऊ लागली आणि दोघेही बेशुद्ध झाले. याच संधीचा फायदा घेत महिलेने पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी ५९ वर्षीय महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील गोविंद कुमरा हे आपल्या पत्नीसह कोपरगाव येथून मंत्रालयाच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेमध्ये त्यांची एका अनोळखी महिलेशी ओळख झाली. या महिलेने आधी दांपत्याचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर प्रसाद असल्याचे सांगत दोघांना चिक्की खाण्यास दिली. मात्र, या चिक्कीमध्ये गुंगीकारक पदार्थ मिसळण्यात आला होता. चिक्की खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांना गुंगी आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर महिलेने पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले आणि तेथून पळ काढला. ही घटना १५ सप्टेंबर २०२६ रोजी घडली होती.
हे ही वाचा:
मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

‘भारताची सभ्यता आणि भाषिक विविधता अद्भुत’

श्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वतीची आगेकूच

घटनेनंतर गोविंद कुमरा यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर १६ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक परिसरातून गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोरे (वय ५९, रा. इटावा, उत्तर प्रदेश) हिला पोलिसांनी अटक केली. तपासात ही महिला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तिच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

दरम्यान, न्यायालयाने आरोपी महिलेला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिक्कीमध्ये नेमका कोणता गुंगीकारक पदार्थ मिसळण्यात आला होता, चोरी केलेले मंगळसूत्र कुठे आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ, प्रसाद किंवा पेये स्वीकारताना प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा