30 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरक्राईमनामाविमानतळावरील चोऱ्या सुरूच; केबिन क्रूच्या बॅगेतून दोन हजार डॉलर्स गायब

विमानतळावरील चोऱ्या सुरूच; केबिन क्रूच्या बॅगेतून दोन हजार डॉलर्स गायब

सहकाऱ्यावर संशय, सहार पोलिसांत गुन्हा

Google News Follow

Related

न्यूयॉर्कहून मुंबईला येणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानात एका महिला केबिन क्रू सदस्याच्या हँडबॅगेतून २,१२० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक रक्कम) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमान प्रवासादरम्यान अथवा मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ही चोरी झाल्याचा संशय असून, याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या बॅगांमधून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या टोळ्या आधीच पोलिसांच्या रडारवर आहेत. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सहार आणि एअरपोर्ट पोलीस ठाण्यात अशा २७ चोऱ्यांची नोंद झाली असून, त्याचा तपास नुकताच मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या २७ प्रकरणांत ४३.२ लाख रुपयांची रोकड आणि ६७ लाख रुपयांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने चोरीला गेले असून, अद्याप एकही मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच आता विमानात थेट क्रू सदस्याचीच बॅग सुरक्षित नसल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिरा रोड परिसरात राहणाऱ्या एस. सना (वय २४) या एअर इंडियाच्या विमानामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत आहेत. १४ ते २१ सप्टेंबरदरम्यान त्यांच्याकडे मुंबई-न्यूयॉर्क-मुंबई या फेरीची जबाबदारी होती. १७ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर क्रू सदस्यांना तीन दिवसांचा ‘ले-ओव्हर’ मिळाला होता. १८ सप्टेंबरला सहकाऱ्यांसोबत फेरफटका मारताना सना यांनी तिथल्या एका एटीएममधून १,००० डॉलर्स काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला त्यांनी आणखी १,००० डॉलर्स काढले.

हे ही वाचा:

अभिजित दिपके दिमागी नक्षल

अखेरच्या क्षणी बाजी पलटली; सुजीतच्या गळ्यात सुवर्ण!

४ ऑक्टोबरला मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

जगाला शांततेचा मार्ग भारतच दाखवू शकतो

२० सप्टेंबरला सर्व क्रू मेंबर्स ‘एआय ११६’ या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईसाठी रवाना झाले. सना यांनी ही सर्व रोकड आपल्या हँडबॅगमध्ये ठेवली होती. ही बॅग विमानात क्रू सदस्यांसाठी आरक्षित असलेल्या कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आली होती. २१ सप्टेंबरला मुंबईत उतरल्यानंतर घरी पोहोचल्यावर बॅग तपासली असता, त्यातील २,१२० डॉलर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सना आणि त्यांच्या पतीने विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र त्यात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली नाही.

अखेर सना यांनी ३० सप्टेंबर रोजी सहार पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांनी आपल्या एका सहकारी कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संबंधित सहकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले असले तरी, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा