32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरबिजनेसएनएसईची ६ लाख कोटींची ऐतिहासिक झेप

एनएसईची ६ लाख कोटींची ऐतिहासिक झेप

जगात तिसरे स्थान पटकावले

Google News Follow

भारतीय शेअर बाजारासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशातील सर्वात मोठे शेअर बाजार व्यासपीठ असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) जागतिक स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. एनएसईचे बाजारमूल्य जवळपास ६ लाख कोटी रुपये म्हणजेच ६४.१ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. यासह बाजारमूल्याच्या बाबतीत एनएसई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सूचीबद्ध स्टॉक एक्स्चेंज बनले आहे. या कामगिरीमुळे भारतीय भांडवली बाजाराची जागतिक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

एनएसईने या ऐतिहासिक भरारीदरम्यान जर्मनीच्या डॉइश बोर्स आणि ब्रिटनच्या लंडन स्टॉक एक्स्चेंजला मागे टाकले आहे. डॉइश बोर्सचे बाजारमूल्य ६३.४ अब्ज डॉलर, तर लंडन स्टॉक एक्स्चेंजचे बाजारमूल्य ६२.४ अब्ज डॉलर आहे. दुसरीकडे अमेरिकेची सीएमई ग्रुप १११.६ अब्ज डॉलरच्या बाजारमूल्यासह पहिल्या क्रमांकावर असून, इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज ९९.४ अब्ज डॉलरच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारातील आघाडीच्या तीन संस्थांमध्ये आता भारतीय एनएसईचा समावेश झाला आहे.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

एनएसईच्या समभागांनीही या घडामोडीला जोरदार प्रतिसाद दिला. २६ नोव्हेंबर रोजी व्यवहारादरम्यान एनएसईचा शेअर ३.५ टक्क्यांनी वधारून २,४०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. नोव्हेंबर महिन्यातील १८ व्यवहार सत्रांपैकी १४ सत्रांमध्ये शेअरने वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबर महिन्यातही समभागात जवळपास ३४ टक्क्यांची तेजी दिसून आली होती. २३ ऑक्टोबरच्या नीचांकी स्तरावरून शेअरने जवळपास ५० टक्क्यांची रिकव्हरी केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही एनएसईच्या समभागाबाबत उत्साह वाढला आहे.

एनएसईची ही कामगिरी केवळ एका कंपनीच्या बाजारमूल्यातील वाढ नसून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे आणि देशांतर्गत भांडवली बाजारावरील वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. शेअर बाजारातील वाढता गुंतवणूकदार सहभाग, व्यवहारांची वाढती उलाढाल आणि आर्थिक साधनांचा विस्तार यामुळे एनएसईला बळ मिळत आहे. जागतिक स्तरावर भारताची आर्थिक पत मजबूत होत असल्याचेही या कामगिरीतून स्पष्ट होते. मात्र, समभागातील वेगवान तेजी लक्षात घेता गुंतवणूकदारांनी बाजारातील जोखीम आणि मूल्यांकनाचा विचार करूनच गुंतवणुकीचे निर्णय घेणे आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा