32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरबिजनेसजास्त साखर, मीठ आणि चरबीयूक्त पदार्थांवर आता चेतावणी चिन्ह

जास्त साखर, मीठ आणि चरबीयूक्त पदार्थांवर आता चेतावणी चिन्ह

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Google News Follow

चिप्स, बिस्किटे, चॉकलेट, शीतपेये आणि इतर पॅकेटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांना आता अधिक सावध राहावे लागणार आहे. कारण, अतिरिक्त साखर, मीठ आणि चरबी असलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर ठळक लाल रंगाचे चेतावणी चिन्ह लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. उत्पादनांमधील आरोग्यासाठी घातक घटकांची माहिती ग्राहकांना सहज समजावी आणि पोषणमूल्यांच्या बारीक अक्षरांमधील माहिती शोधण्याची गरज पडू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने २६ नोव्हेंबर रोजी हे निर्देश दिले.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या खाद्यपदार्थांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साखर, मीठ किंवा चरबी असेल, त्यांच्या पाकिटांवर स्वतंत्र लाल षटकोनी चेतावणी चिन्ह लावावे लागणार आहे. या चिन्हांवर ‘अतिरिक्त साखर’, ‘अतिरिक्त मीठ’ आणि ‘अतिरिक्त चरबी’ असे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. विशेष म्हणजे, पाकिटाच्या दर्शनी भागावर ही चिन्हे ठळकपणे दिसली पाहिजेत आणि त्यासाठी किमान चार ते पाच टक्के जागा राखून ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एखादा पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यातील आरोग्यासाठी घातक घटकांची माहिती एका नजरेत मिळू शकेल.
हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला चार महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत नव्या नियमांचा मसुदा तयार करून आवश्यक नियामक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, दहा आठवड्यांनंतर प्रगती अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. नियम अंतिम झाल्यानंतर खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांना नवीन पॅकेजिंग लागू करण्यासाठी ३६५ दिवसांचा संक्रमण कालावधी देण्याची तरतूद विचाराधीन आहे. त्यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये मोठे बदल करावे लागण्याची शक्यता आहे.

वाढते लठ्ठपणाचे प्रमाण, मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः लहान मुले आणि तरुणांमध्ये जंक फूडचे वाढते आकर्षण लक्षात घेता न्यायालयाने शालेय अभ्यासक्रमात पोषणविषयक शिक्षणाचा समावेश करण्यावरही भर दिला आहे. केवळ आकर्षक जाहिराती आणि पॅकेजिंगच्या जोरावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना आता उत्पादनातील घटकांची माहिती लपवता येणार नाही. ग्राहकांना केवळ खाद्यपदार्थ विकणे नव्हे, तर त्यांच्या आरोग्याशी संबंधित संभाव्य धोक्यांची स्पष्ट माहिती देणेही कंपन्यांची जबाबदारी असेल, असा ठोस संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा