30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरराजकारणशरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

Google News Follow

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. शरद पवार यांची प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास आणि प्रवास कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये वडिलांच्या कामाच्या आवडीचा उल्लेख करत म्हटले की, बाबांना विश्रांती घेण्यास आणि प्रवास कमी करण्यास सांगितले आहे; मात्र ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांना कामाची प्रचंड आवड आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

दरम्यान, ८५ वर्षीय शरद पवार यांना यापूर्वीही याच वर्षात अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी खोकला आणि छातीत दुखत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले होते. त्यानंतर छाती आणि श्वसनसंस्थेच्या संसर्गावर मुंबईत उपचार करण्यात आले होते. आता पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा