32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरक्राईमनामाइस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा अर्थप्रमुख ठार

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा अर्थप्रमुख ठार

देर अल-बलाहमधील हल्ल्यात पत्नीचाही मृत्यू

Google News Follow

इस्रायलने गाझा पट्टीतील हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ अधिकारी आणि आर्थिक व्यवहारांचा प्रमुख खालिद अबू नदा याला ठार केले आहे. मध्य गाझातील देर अल-बलाह परिसरात करण्यात आलेल्या या हल्ल्यात अबू नदासह त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी गुरुवारी या कारवाईची माहिती दिली.

इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, अबू नदा हा हमासच्या आर्थिक आणि शैक्षणिक विभागाची जबाबदारी सांभाळत होता. हमासच्या बँकिंग व्यवहारांचे तसेच गुंतवणूक नेटवर्कचे व्यवस्थापन त्याच्याकडे होते. या माध्यमातून दहशतवादी कारवाया आणि हमासच्या लष्करी क्षमतेत वाढ करण्यासाठी निधी पुरवला जात असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. त्याच्या मृत्यूमुळे हमासच्या आर्थिक व्यवहारांना आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसेल, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

दरम्यान, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री कात्झ यांनी संयुक्त निवेदनात गेल्या महिन्याभरात इस्रायली लष्कराने हमासच्या सुमारे ८० सदस्यांना ठार केल्याचा दावा केला. हमासच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठलाग सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

२६/११ च्या हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

संविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल

तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

दुसरीकडे, पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देर अल-बलाह येथील निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात अबू नदा आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य सहा जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. पॅलेस्टिनी वृत्तसंस्थांनी अबू नदा याची गाझाच्या हमास-नियंत्रित प्रशासनातील उपशिक्षणमंत्री म्हणूनही ओळख दिली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये युद्धविराम करार झाल्यानंतरही गाझामधील हिंसाचार थांबलेला नाही. गेल्या काही दिवसांत इस्रायलने हमासच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा