29.6 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सनीरू ढांडा भारताच्या ध्वजवाहक

नीरू ढांडा भारताच्या ध्वजवाहक

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाज नीरू ढांडा यांनी शानदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकासह एकूण ३ पदकांची कमाई केली. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून नीरू यांची निवड करण्यात आली आहे.

२७ वर्षीय नीरू यांनी महिलांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत आशीमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्यासोबत खेळताना रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने पात्रता फेरीत ३२८ गुण मिळवले.

यानंतर नीरू यांनी वैयक्तिक ट्रॅप स्पर्धेत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. पात्रता फेरीत ११८ गुणांसह अव्वल राहिल्यानंतर अंतिम फेरीत त्यांनी २८ हिट्स नोंदवत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीसह आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक ट्रॅपमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

नीरू यांचा सुवर्णमय प्रवास इथेच थांबला नाही. कायन चेनाई यांच्या साथीने त्यांनी ट्रॅप मिश्र सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत ३४ हिट्स नोंदवत विजय मिळवला. या कामगिरीतून त्यांनी ३३ हिट्सचा आशियाई विक्रमही मोडीत काढला.

नीरू ढांडा : पदकांची ‘हॅट्ट्रिक’

🥇 २ सुवर्ण | 🥈 १ रौप्य | 🏅 एकूण ३ पदके

वैयक्तिक सुवर्णपदकानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पुन्हा शूटिंग रेंजवर उतरून नीरू यांनी मिश्र सांघिक स्पर्धेतही सुवर्ण मिळवले. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे त्या भारताच्या प्रमुख पदकविजेत्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या.

आता ४ ऑक्टोबरला नागोया सिटी मिजुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात तिरंगा घेऊन चालण्याचा मान नीरू ढांडा यांना मिळणार आहे. भारताच्या नेमबाजीतील या सुवर्णकन्येच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा