माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा धक्का

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा धक्का

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज, सोमवारी हृदयविकाराचा धक्का बसला. जाधव दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असतांना त्यांना छातीत त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत.  

शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, काही कामानिमित्त हर्षवर्धन जाधव हे दिल्लीला गेले होते. तिथे ते नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले असताना, नितीन गडकरी यांच्या निवासस्थानीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी केल्यावर हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प होणार रायगड जिल्ह्यातच

‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांची पाटी कोरी, १८ जणांचे पथक जाणार

हिजाबशिवाय अभिनेत्रीचे पोस्टर; इराणमध्ये चित्रपट महोत्सवावरच बंदी  

हर्षवर्धन जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी यापूर्वीच अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version