गाझियाबादमध्ये २९ टक्के तर नोएडामध्ये २४ टक्के मतदारांच्या नावांवर फुली

या यादीत तब्बल १२.७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, दोन्ही जिल्ह्यांतील एकूण मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

गाझियाबादमध्ये २९ टक्के तर नोएडामध्ये २४ टक्के मतदारांच्या नावांवर फुली

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा (गौतम बुद्ध नगर) जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष मतदारयादी पुननिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेनंतर जाहीर करण्यात आलेल्या या यादीत तब्बल १२.७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, दोन्ही जिल्ह्यांतील एकूण मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

गाझियाबाद जिल्ह्यात यापूर्वी सुमारे २८.४ लाख मतदार नोंदणीकृत होते. मात्र नव्या मसुदा मतदार यादीत ही संख्या २०.१ लाखांवर आली असून, सुमारे २९ टक्के, म्हणजेच ८.३ लाख मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

तर गौतम बुद्ध नगर (नोएडा) जिल्ह्यात यापूर्वी १८.७ लाख मतदार नोंदणीकृत होते. नव्या यादीत ही संख्या १४.३ लाखांवर आली असून, येथे सुमारे २४ टक्के, म्हणजेच ४.४ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
आंदोलनामुळे पोळलेल्या इराण सरकारकडून लोकांना आर्थिक आमिष

मतदार यादी सुधारण्यासाठी एसआयआर प्रक्रिया आवश्यक

जागतिक स्तरावर तेल घसरणार

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार, मतदार यादीतून नावे वगळण्यामागे अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत अशा एएसडी (एब्सेंट–शिफ्टेड–डेड) श्रेणीतील मतदार हे मुख्य कारण आहे. याशिवाय, दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ लाख मतदार ‘अनमॅप्ड’ असल्याचेही समोर आले आहे. म्हणजेच, या मतदारांची माहिती जुन्या २००३ सालच्या मतदार नोंदींशी जुळलेली नाही.

मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता दावे व हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक अधिकाऱ्यांकडे दावा सादर करू शकतात. प्रशासनाने नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्याचे आणि वेळेत हरकत नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version