‘शाई पुसण्याचा हेतू गुन्हेगारीचा’

भाजप नेते आशिष शेलार यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘शाई पुसण्याचा हेतू गुन्हेगारीचा’

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर गंभीर आरोप केले. शेलार यांनी म्हणजे “बोटावरची शाई पुसणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे” असे आव्हान केले आणि त्या प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न हा मतदान प्रक्रियेशी छेडछाड करण्याचा गंभीर मुद्दा आहे आणि यावर निवडणूक आयोगानेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
एफआयआर स्थगित; आय-पीएसी छाप्याचे सीसीटीव्ही सुरक्षित ठेवा!

बीसीसीएल आयपीओचे शेअर वाटप जाहीर

बोटावरील शाई पुसणे हा गुन्हा!

सरसंघचालक मोहन भागवत, सचिन तेंडूलकरसह बॉलीवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले पंरतू मतदान सुरु असताना तुम्ही पत्रकार परिषद कशी घेऊ शकता असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. ठाकरे यांचे सल्लागार सडके असून ठाकरेंचे आडनाव बदलून रडके असे ठेवले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरेंच्या मेंदुमध्ये केमिकल लोचा झाला असून यामुळेच त्यांच्याकडून असे बिनबुडाचे आरोप हे केले जात असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

यावेळी शेलार यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेवर संशय निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत गंभीर असून यामुळे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. निवडणूक काळात अशा प्रकारचे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेलार यांच्या मते, निवडणूक आयोग ही स्वतंत्र व निष्पक्ष संस्था असून तिच्या कामकाजावर संशय घेणे म्हणजे लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. भाजप लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवणारा पक्ष असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मुळीच पाठिंबा देणार नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version