25 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरराजकारणराहुल गांधी रवनीत बिट्टूंना म्हणाले, 'गद्दार'...बिट्टूंनी प्रत्युत्तर दिले 'देश के दुश्मन'!

राहुल गांधी रवनीत बिट्टूंना म्हणाले, ‘गद्दार’…बिट्टूंनी प्रत्युत्तर दिले ‘देश के दुश्मन’!

संसदेच्या पायऱ्यांवर घडले नाट्य

Google News Follow

Related

राहुल गांधी यांच्या संसदेतील वर्तनावर टीका होत असताना आता संसदेच्या बाहेरही त्यांचे वर्तन हुकुमशाहीला साजेसे आहे का, अशी टीका होऊ लागली आहे. बुधवारी संसदेच्या पायऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांना उद्देशून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा झाली. राहुल गांधी एका खासदाराबाबत अशी टिप्पणी कशी काय करू शकतात, याबद्दल आश्चर्य आणि रागही व्यक्त करण्यात आला.

बुधवारी संसदेच्या आवारात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि त्यांचे माजी सहकारी तसेच केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सभागृहातील कामकाजावरून वातावरण तापलेले असताना ही घटना घडली.

ही शाब्दिक चकमक सत्र सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी केलेल्या निदर्शनादरम्यान झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले, काँग्रेसचे तीन वेळा खासदार राहिलेले रवनीत बिट्टू यांना राहुल गांधी यांनी “माझा गद्दार मित्र” असे संबोधले. यावर बिट्टू यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत राहुल गांधींना “देश का दुश्मन” (देशाचा शत्रू) असे म्हटले.

हे ही वाचा:

सोने- चांदी पुन्हा चमकले! चांदीच्या किंमती १६,००० रुपयांनी वाढल्या

अमेरिकेच्या टॅरिफ कपातीचा भारताला मोठा फायदा

भारत-अमेरिका ट्रेड डील; खात्री बाळगा, ट्रम्प मोदींना सॉरी म्हणाले असतील…

“चिकन नेक” कॉरिडॉर अधिक सुरक्षित! भूमिगत रेल्वे ट्रॅक बनवणार

मकर द्वाराजवळ आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांजवळून बिट्टू जात असताना राहुल गांधी म्हणाले,“इथे एक गद्दार चालला आहे. त्याचा चेहरा बघा.” यानंतर राहुल गांधी यांनी बिट्टूकडे हात पुढे करत म्हणाले, “हॅलो भाऊ, माझ्या गद्दार मित्रा. काळजी करू नकोस, तू परत काँग्रेसमध्ये येशील.”

बिट्टू यांनी हस्तांदोलन नाकारले आणि तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देत राहुल गांधींना “देश का दुश्मन” असे संबोधले. यावेळी दोघांमध्ये थोडा वेळ जोरदार शब्दांची देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले.

२०२४ मध्ये, अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी शीख समाजाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून बिट्टू यांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि इतकेच नव्हे तर त्यांना “देशातील नंबर वन दहशतवादी” असेही संबोधले होते. या वक्तव्याचा काँग्रेसने तीव्र निषेध करत त्याला “अत्यंत खालच्या पातळीचे” असल्याचे म्हटले होते. तसेच बिट्टू यांची काँग्रेसमधील राजकीय कारकीर्द “पूर्णपणे गोंधळलेली” असल्याचा आरोप केला होता. याशिवाय, या विधानावरून भाजपने तात्काळ बिट्टू यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा