28.3 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरक्राईमनामादिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाने तपासाला नवे वळण

Google News Follow

Related

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी दिशा मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ मॉनिटरिंग कमिटीच्या ताज्या अहवालात या हल्ल्याचा संबंध अल-कायदाशी संबंधित ‘अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (AQIS) या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात अल-कायदाकडून दक्षिण आशियात आपले नेटवर्क विस्तारण्याच्या प्रयत्नांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः बांगलादेशात ऑपरेशनल सेल उभारण्याच्या हालचालींकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणानुसार, अल-कायदाशी संबंधित हालचाली केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. दक्षिण आशियातील विविध भागांमध्ये संघटनेचे नेटवर्क, भरती आणि दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बांगलादेशात अशा प्रकारचे नेटवर्क सक्रिय झाल्यास भारताच्या सुरक्षेसमोरही नवे आव्हान निर्माण होऊ शकते, विशेषतः भारताच्या पूर्व सीमेजवळ कट्टरतावादी प्रचार, तरुणांची भरती, निधीची व्यवस्था आणि लॉजिस्टिक नेटवर्क विस्तारण्याचा धोका वाढू शकतो.

१० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका वाहनात भीषण स्फोट झाला होता. या घटनेत जीवितहानी झाली, तर अनेक जण जखमी झाले. वाहनात स्फोटकांचा वापर करून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA ने तपास हाती घेतला. त्यानंतर स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या वाहनापासून आरोपींच्या संपर्कांचे जाळे, आर्थिक व्यवहार आणि दहशतवादी नेटवर्कपर्यंत तपासाचा विस्तार करण्यात आला.

या तपासात डॉ. उमर उन नबी याचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आले. तो पुलवामा येथील रहिवासी असून फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. स्फोटात त्याचा मृत्यू झाला असून डीएनए तपासणीद्वारे त्याची ओळख निश्चित करण्यात आली.

मे २०२६ मध्ये एनआयएने या प्रकरणात तब्बल ७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात १० आरोपींची नावे असून, तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार हे आरोपी अन्सार गझवत-उल-हिंद (AGuH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. AGuHचा संबंध अल-कायदाशी जोडला जातो.

हे ही वाचा:

३६ वर्षांनंतर काश्मिरी पंडित पिता-पुत्र हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडली

नीट आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप सिद्ध, घरात सापडली होती प्रचंड रोकड

इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यक्तींचा कथित सहभाग. एनआयएच्या तपासानुसार, कट्टरतावादी विचारसरणीच्या प्रभावाखाली आलेल्या काही डॉक्टरांनी या दहशतवादी नेटवर्कला मदत केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, या नेटवर्कचे धागेदोरे काश्मीर, दिल्ली आणि फरिदाबादपर्यंत पोहोचले होते. उच्चशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींच्या माध्यमातून नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा