30 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरस्पोर्ट्समोहित उल्वाची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

मोहित उल्वाची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

कसोटीपटू प्रवीण अमरेंनी केले कौतुक

Google News Follow

एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शनिवारी भारताने पाकिस्तानचा एका गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. विशेषतः मोहित उल्वाने खेळलेल्या झुंजार खेळीचे त्यांनी कौतुक केले.

अंतिम सामन्यात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोहितने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर शानदार चौकार मारत त्याने भारतीय संघाला विजयासह विजेतेपद मिळवून दिले.

‘आयएएनएस’शी बोलताना प्रवीण आमरे म्हणाले, “होय, हा ऐतिहासिक विजय होता. कारण भारताने ज्या पद्धतीने हा सामना जिंकला, ते विशेष होते. ३४ षटकांत पाकिस्तानने २६० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने तीन महत्त्वाचे बळी मिळवले. हा आपल्या गोलंदाजी विभागाचा दमदार पुनरागमनाचा टप्पा होता. याचे श्रेय गोलंदाजी प्रशिक्षक व्ही.आर.व्ही. सिंग यांनाही द्यायला हवे. अखेरच्या १० षटकांत आपण कमी धावा दिल्या, त्याचाही आपल्याला फायदा झाला.”

हे ही वाचा:

पाकिस्तानातील ‘आका’च्या आदेशावरून राजस्थान रेल्वे ट्रॅकवर घडवला स्फोट

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटामुळे तीन तेलवाहू जहाजांना आग

रेस्टॉरंटशिवाय उभा राहतोय कोट्यवधींचा फूड बिझनेस

मुंबईत सीएनजीच्या दरात दीड रूपयांनी वाढ

ते पुढे म्हणाले, “अंतिम सामन्यात ३३८ धावांचे लक्ष्य गाठणे सोपे नसते. यासाठी मी फलंदाजी प्रशिक्षकांचेही अभिनंदन करेन. ३३८ धावांचे लक्ष्य कसे गाठायचे, हे भारतीय फलंदाजी क्रमासमोरील मोठे आव्हान होते. आर्यवीर सेहवागने संघाला चांगली सुरुवात करून दिली, तर लक्ष्यनेही खेळावर उत्तम नियंत्रण ठेवले. मधल्या फळीतील फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी आपापली भूमिका चोख बजावली. मात्र, मोहितने खेळलेली खेळी विलक्षण होती. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्याने कमालीची परिपक्वता दाखवली. त्याची परिपक्वता पाहून असे वाटत होते की, जणू त्याने १० विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला विजय मिळवून देणे ही खूप मोठी गोष्ट आहे.”

मोहितचे कौतुक करताना आमरे म्हणाले, “माझ्या मते मोहितने अंडर-१९ आशिया चषकातील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी केली. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघ आणि प्रशिक्षक वर्गाला जाते. आर्यवीरचेही मी अभिनंदन करतो. त्याने ‘मालिकावीर’ पुरस्कार पटकावला. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार मिळवणे हीदेखील मोठी गोष्ट आहे. मोहित उल्वाने आपल्या खेळीतून हे करून दाखवले. त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचून विजेतेपद जिंकू शकला.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा