27 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरबिजनेसमुंबईत सीएनजीच्या दरात दिड रूपयांनी वाढ

मुंबईत सीएनजीच्या दरात दिड रूपयांनी वाढ

आज रात्रीपासून नवे दर लागू

Google News Follow

मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा नवा दर प्रति किलो ९१.५० रुपये झाला आहे. सुधारित दर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरवड्यातील ही दुसरी दरवाढ असून, यामुळे खासगी वाहनचालकांसह रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या इंधन खर्चात आणखी भर पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १२.९३ लाख सीएनजी वाहनांना या दरवाढीचा थेट फटका बसणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सप्टेंबरमध्ये प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाल्यानंतर सीएनजीचा दर ८८ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये एक रुपयाची वाढ होऊन दर ८९ रुपये झाला. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एक रुपयाची वाढ करण्यात आली आणि दर ९० रुपयांवर पोहोचला. आता १५ नोव्हेंबरपासून आणखी दीड रुपयांची वाढ झाल्याने सीएनजीचा दर ९१.५० रुपये झाला आहे. म्हणजेच, दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सीएनजी प्रति किलो ३.५० रुपयांनी महागला आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारकांचे मासिक इंधन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
मेट्रोचा विस्तार मोठा, पण किती होईल नफा-तोटा?

मोदींनी काँग्रेसजनांना असे केले ‘टॅप’ |

कोकणातल्या तीन सुवर्णकिनाऱ्यांवर ‘निळा झेंडा’ |

नवा प्रवास सुरू सेनाभवन ते टिळकभवन |

या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याशी संबंधित अडचणी असल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेतील संकटामुळे गॅस खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या कोट्यात कपात झाल्याने आयात केलेल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवरील (आरएलएनजी) अवलंबित्व वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा परिणाम गॅस खरेदी खर्चावर होत असल्याने ग्राहकांना अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी दरवाढ करावी लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, सततच्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते थम्पी कुरियन यांनी इंधन खर्चाच्या तुलनेत रिक्षाभाड्यात पुरेशी वाढ होत नसल्याकडे लक्ष वेधले आहे. सप्टेंबरमध्ये रिक्षांचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले होते. मात्र, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, महानगर गॅस आणि गुजरात एनर्जीच्या सीएनजी दरांमध्येही मोठी तफावत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. गुजरात एनर्जीचा दर ८५.७५ रुपये प्रति किलो असल्याने दोन्ही दरांमध्ये ५.७५ रुपयांचा फरक आहे. त्यामुळे सीएनजी दरवाढीचा भार अखेर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरही पडण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा