नरेंद्र मोदी हे संपर्क निर्माण करण्यात वाकबगार आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यातून अनेकांना धक्काही बसत असतो. आता मोदींनी आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे सॅम पित्रोडा यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच तिकडे कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासोबतही काही हलकेफुलके क्षण घालवले.



