33 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषझाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

पनवेल मनपाचा वृक्षसंवर्धनासाठी कठोर निर्णय

Google News Follow

शहरातील हरितपट्टा टिकवण्यासाठी आणि वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. झाडांच्या खोडाला खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावणे किंवा सण-उत्सवांत झाडांभोवती विद्युत रोषणाई करणे यापुढे चांगलेच महाग पडणार आहे. अशा प्रकारे झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांकडून १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार असून, चौथ्यांदा हाच गुन्हा केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पहिल्या वेळी एक हजार रुपये, दुसऱ्या वेळी तीन हजार रुपये, तर तिसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड आकारण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, चौथ्यांदा अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम २१(१) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असेल. नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने झाडांची छाटणी केल्यास झाडामागे २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. महापालिकेमार्फत छाटणी करून घेतल्यास प्रत्येक झाडासाठी १२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

हे ही वाचा:

अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!

लक्ष्य सेनने जिंकला कुमामोटो मास्टर्सचा किताब

राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘परकीय हात’

महापालिकेच्या या कठोर निर्णयामुळे राजकीय कार्यकर्ते, व्यावसायिक संस्था आणि कार्यक्रम आयोजकांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्याची अपेक्षा आहे. मात्र, हा निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा