दिल्ली निवडणुकीत काँग्रेस, आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत

दिल्ली निवडणुकीत काँग्रेस, आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत असून तब्बल २७ वर्षांनी भाजपा दिल्लीत बहुमताचे सरकार स्थापन करेल, अशी शक्यता आहे. आप पक्षाला काही जाग मिळवण्यात यश आले असले तरी काँग्रेसला मात्र अद्याप भोपळाही फोडता आलेला नाही. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ‘इंडी’ आघाडीमधील नेत्यांकडून आप आणि काँग्रेस यांना लक्ष्य केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही दिल्लीतील निवडणूक निकालांवरून आप आणि काँग्रेसला सुनावले आहे.

“काँग्रेस आणि आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते. काँग्रेस आणि आपचा शत्रू भाजपा आहे. काँग्रेस आणि आप दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर पहिल्या तासातच जिंकले असते,” असं मत मांडत संजय राऊत यांनी दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. पुढे ते म्हणाले की, “दिल्ली एक लहान राज्य असून नायब राज्यपाल यांच्याकडे अधिकार असतात. त्यांनी तिकडे अरविंद केजरीवाल यांना कामच करून दिले नाही. जागोजागी टेबल टाकून पैसे वाटले जात असल्याचे पाहिले होते. तक्रार घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना अमित शाह यांनी पोलिसांना दिल्या होत्या,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

दिल्लीत आप, काँग्रेसची परिस्थिती पाहून ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!

१८३ पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमास तीन ओलिसांची सुटका करणार

रडारवरून गायब झालेल्या अलास्कातील विमानाचे अवशेष सापडले; तीन मृतदेह आढळले

दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी

इंडिया आघाडीतील फुटीमुळेच दिल्लीतील आपची सत्ता गेल्याचं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी ओमर अब्दुल्लांच्या मताशी सहमत आहे. इंडिया ब्लॉक हा भाजपला हरवण्यासाठी केला होता. हरयाणात एकी असती आणि दिल्लीत एकी असती तर हा निकाल वेगळा असता. महाराष्ट्रात आमच्या सहकाऱ्यांनी संयम दाखवला असता तर आम्ही थोडं पुढे गेलो असतो, असं ते म्हणाले.

Exit mobile version