महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. १२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २४३० दिवस (सुमारे ६ वर्षे ७ महिने) इतका झाला असून, त्यांनी शरद पवार (२, ४१२ दिवस) च्या फरकाने मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण पाच वर्षांचा होता, दुसरा केवळ 6 दिवसांचा, तर तिसरा कार्यकाळ सध्या सुरू असून १२ जुलै २०२६ पर्यंत त्याला ५८५ दिवस पूर्ण झाले आहेत.
महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते
1) वसंतराव नाईक – ४,०९६ दिवस (११ वर्षे ७८ दिवस)
2) विलासराव देशमुख – २,६८६ दिवस (सुमारे ७ वर्षे १२९ दिवस)
3) देवेंद्र फडणवीस – २,४३० दिवस (सुमारे ६ वर्षे ७ महिने) (१२ जुलै २०२६ पर्यंत)
4) शरद पवार – २,४१२ दिवस (सुमारे ६ वर्षे २२१ दिवस)
हे ही वाचा:
डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला
तेल दरवाढीने पाकिस्तानची कोंडी; पेट्रोल, बस-रिक्षा, मालवाहतुकीचे दर वाढले
पश्चिम बंगालमध्ये लागू झालेला ‘गुंडा दमन कायदा’ काय आहे?
पेन्शन काढायला गेलेल्या ८२ वर्षीय वृद्धाच्या खात्यात दिसले ७५९ कोटी!
या नव्या टप्प्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला असून त्यांचा विद्यमान कार्यकाळ सुरू असल्याने ही नोंद आगामी काळात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.
