रात्रीस जमाव ‘न’ चाले… २८ मार्च पासून

रात्रीस जमाव ‘न’ चाले… २८ मार्च पासून

रविवार २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात प्रथम क्रमांकावर आहे. तर जगात रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.

शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोना संदर्भातील एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, विभाग आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स या सर्वांशी चर्चा करून राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतरच राज्यात २८ तारखेपासून रात्रीची जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?

भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार

पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार

फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे,संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने राज्यभरात रविवार,२८ मार्च २०२१ पासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या जमावबंदी संदर्भात लवकरच आपत्ती निवारण आणि पुनर्वसन विभागाकडून आदेश काढण्यात येणार आहे. या जमावबंदीच्या काळात राज्यातील मॉल्स हे रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जमावबंदी काळातील बाकीची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान शुक्रवारी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना बद्दलची चर्चा करण्यात आली. पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन एप्रिलला लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

Exit mobile version