अखेर संजय राठोडांचा राजीनामा

अखेर संजय राठोडांचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड याने मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राजीनामा स्वीकारण्याचा किंवा ना स्वीकारण्याचा ‘चेंडू हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे.’ आता यावर उद्धव ठाकरे का निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याच प्रकरणामध्ये आज मातोश्रीवर एक बैठक होणार होती. परंतु आता संजय राठोड याने राजीनामा दिल्यानंतर ही बैठक होणार का? हेही पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

मूळची परळीची असलेली २२ वर्षीय पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री १ च्या आसपास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजाने आत्महत्त्या केल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज काही सापडलेले नाहीत. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजत आहे. हे संपूर्ण प्रकरण तापत गेलं, भाजपाच्या विविध नेत्यांनीही या प्रकरणात सरकारवर टीकाही केली आणि संजय राठोडवर कारवाई करण्याची मागणीही केली.

हे ही वाचा:

“अशा धमक्यांना भीक घालणार नाही” – अतूल भातखळकर

परंतु या सर्व प्रकारानंतरही मंत्री महोदय स्वतः चार दिवस बेपत्ता होते. मात्र विरोधकांनी आणलेल्या या दबावामुळे संजय राठोडना राजीनामा द्यावा लागल्याचे दिसत आहे.

Exit mobile version