केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तमिळनाडूच्या राजकारणावर महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) राज्यात सत्तेत आली, तर तमिळनाडूत सुशासन, पारदर्शकता आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत राज्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पीयूष गोयल यांनी सध्याच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) सरकारवर टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केले. सध्याच्या कारभारामुळे राज्यातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीए सत्तेत आल्यास तमिळनाडूला एक सुरक्षित, सक्षम आणि विकसित राज्य बनवण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
ग्रीनलँड सुरक्षित ठेवण्याची क्षमता फक्त अमेरिकेकडे
कल्याण-डोंबिवली शिवसेना मनसे युती
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांचा राजीनामा
एआयनिर्मित नकाशातून ट्रम्पनी दाखवले ग्रीनलँड, कॅनडा, व्हेनेझुएला हे अमेरिकेचे!
गोयल यांनी सांगितले की, एनडीए सरकारमध्ये महिलांसाठी विशेष योजना राबवण्यात येतील. महिलांना रोजगाराच्या संधी, सुरक्षितता आणि समान हक्क मिळावेत यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठीही विविध सामाजिक व आर्थिक कल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जातील, ज्याचा थेट फायदा जनतेला होईल.
तमिळनाडूची संस्कृती, भाषा आणि ओळख जपण्यावर भर दिला जाईल, तसेच राज्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली जाईल, असेही गोयल यांनी सांगितले. एनडीएचे उद्दिष्ट केवळ निवडणूक जिंकणे नसून राज्यात नवीन सामाजिक व आर्थिक प्रगती घडवून आणणे आहे.
दरम्यान, अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एआयडीएमके) या पक्षाने एनडीएला पुन्हा पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षप्रमुख टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्या या निर्णयामुळे एनडीए अधिक बळकट झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. हा निर्णय तमिळनाडूच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
