26 C
Mumbai
Friday, February 13, 2026
घरराजकारणरायगडमध्ये भरत गोगावलेंना पहिल्यांदाच ध्वजारोहणाचा मान

रायगडमध्ये भरत गोगावलेंना पहिल्यांदाच ध्वजारोहणाचा मान

सुनिल तटकरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचा बदल घडताना दिसत असून, यंदा प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळाला. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणा पार पडेल. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दीर्घकाळ रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून, विशेषतः सुनिल तटकरे हे जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जात होते. मात्र यंदाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमात तटकरे यांना हा मान न मिळाल्याने, त्याला राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सत्तासमीकरणे बदलत असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांकडून केली जात आहे.
हे ही वाचा:
दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती

सुनिता विल्यम्स यांची ‘नासा’तून निवृत्ती

उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील १० बेकायदेशीर मझारी जमीनदोस्त

प्रयागराजमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

भरत गोगावले हे सध्या रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी गटातील महत्त्वाचे नेते मानले जात असून, त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे हे प्रतिक असल्याचे बोलले जात आहे. ध्वजारोहणानंतर बोलताना गोगावले यांनी, “रायगडच्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रोजगार आणि उद्योगवाढ यावर भर देण्यात येईल,” असे सांगितले.

दुसरीकडे, सुनिल तटकरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय राजकीय हेतूने घेतला गेल्याचा आरोप केला आहे. मात्र प्रशासनाकडून हा निर्णय प्रचलित नियमांनुसार आणि सध्याच्या सत्तास्थितीचा विचार करून घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकंदरीतच, रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा ठरला आहे. बदलत्या राजकीय वाऱ्यांची दिशा या घटनेतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा