28.5 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026
घरराजकारणकनेक्टिंग लिंकबाबतचा सगळा खोटारडेपणा समोर आला!

कनेक्टिंग लिंकबाबतचा सगळा खोटारडेपणा समोर आला!

देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात दिले आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर

Google News Follow

Related

मुंबई पुणे मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर त्यावर प्रचंड टीका झाली. विरोधकांनी ७००० कोटी वाया गेल्याची टीका केली. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सविस्तर उत्तर दिले. तसेच विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की, काही लोकं अशी आहेत जी एखाद कोटी लोक मेल्यावर पैदा झालेत. खोटं बोलायाल लाजही वाटत नाही. टीव्हीवर येऊन खोटं सांगतात कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यावरही. कनेक्टिंग लिंकबाबातचा खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण महायुती सरकारची हिंमत होती, म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधू शकलो.

फडणवीसांनी सांगितलं की, ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली. तेव्हा लोक म्हणायचे ही रेल्वे बांधता येणार नाही, इथे दरड कोसळते म्हणून भीती दाखवली जायची. पण मधू दंडवते यांनी हिंमत दाखवली. दरवर्षी दरड कोसळायची. पण आपण शिकायचो. दरड कोसळणं बंद करायचो. जर या भीतीने कोकण रेल्वे सुरूच केली नसती तर काय अवस्था झाली असती. या मिसिंग लिंकचा इतिहाससुद्धा असाच आहे. आघाडी सरकारमध्ये मिसिंग लिंकबाबतचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून १४ कारणं सांगून मिसिंग लिंक करता येणार नाही, असं सांगून फाइल बंद केली. पण गिरते है शहसवार मैदाने जंग मे. वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनो के बल चले. आम्ही ते आव्हान स्वीकारलं आणि मिसिंग लिंक उभारून दाखविली.

फडणवीस म्हणाले की, आम्ही निर्णय केला, अधिकाऱ्यांशी, तज्ज्ञांशी बोललो. त्यांनी म्हटले आपण हे करू शकतो, आपण करून दाखवले. ही नुसती लिंक नाही इंजिनिअरिंग मार्वल तयार झाले. जगातला सगळ्यातला रुंद बोगदा आणि भारतातली सगळ्यातली उंच केबल स्टेड ब्रिज आपण तयार करून दाखवला. १७० प्रति तास वारा येतो तिथे तरीही आपण ही लिंक तयार केली. आज या लिंकमुळे घाट सेक्शनचे अपघात संपले, रहदारी कमी झाली. घडलं काय तर दरड कोसळली. कमानीवर पडली आणि ती दरड कोसळून त्याचा ढिगारा जमला. केबल स्टेडला तडा नाही, बोगद्याला काही बाधा पोहोचली नाही. उलट बोगदा होतो म्हणून आम्ही वाचलो असे लोकंनी सांगितले. लगेच असे व्हिड्युअल दाखवले की, कनेक्टिंग लिंकच तुटली.

हे ही वाचा:

शिवसेनेचे मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, डॉक्टर, नर्सेसना केली मारहाण

ना तारीख, ना सुनवाई ४ दिवसात फैसला…

इराणवर अमेरिकेचा हल्ला; तेलाच्या किमती भडकल्या

पाकिस्तानात मरणही झाले महाग!

मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको!

काही तोंडाळ लोक बोलू लागले की, ७००० कोटी वाया गेले. पण घटना घडल्यावर १८ तासांत ट्रॅफिक सुरू झाला. सवाल हा नाही. देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या. मी शिव्याप्रूफ आहे. आजपासून १० वर्षांनी शिव्या देणारे दिसणार नाहीत. कनेक्टिंग लिंक असेल. देवेंद्र आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. पैसे घेऊन काही भाड्याचे लोक सोशल मीडियात लिहित होते, त्यांना सांगू इच्छितो, महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा