राहुल गांधींना मोदी शातिर दिमाग का म्हणाले?

राज्यसभेत केला घणाघात

राहुल गांधींना मोदी शातिर दिमाग का म्हणाले?

New Delhi: Prime Minister Narendra Modi speaks during his reply to the Motion of Thanks to the President’s Address in the Rajya Sabha during the Budget Session of Parliament in New Delhi on Thursday, February 5, 2026. (Photo: IANS/Video Grab/Sansad TV)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्यावर कठोर टीका केली. राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही मुद्द्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लोकसभा अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला गेला. नरेंद्र मोदी यांचे बुधवारी भाषण होणार होते, ते होऊ नये यासाठी काँग्रेस आणि विरोधकांच्या महिला खासदारांनी मोदी जिथे बसतात, त्या जागेभोवती बॅनर घेऊन गोंधळ घातला. त्यावरून मोदींनी आपल्या भाषणात निशाणा साधला.

मोदी म्हणाले की,  काल काँग्रेसचे शातिर दिमाग राजपुत्र रवनीत बिट्टू यांना गद्दार म्हणाले, अहंकार किती वरपर्यंत पोहोचला आहे पाहा. काँग्रेसमधऊन अनेक लोक सोडून गेले. किती लोकांना ते गद्दार म्हणाले. पण बिट्टू यांना म्हणाले कारण ते शीख आहे. काँग्रेसमध्ये शिखांप्रती जो राग आहे तेच तिथे दिसले. पण त्यावर माफी मागता आली असती. मात्र शिखांबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांनी पक्ष सोडला म्हणून ते गद्दार कसे झाले. माझ्या देशवासियाला कुणी गद्दार म्हणेल, हे कसे काय सहन केले जाऊ शकते. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. हे काँग्रेसला बुडवणार नाहीत तर काय?

हे ही वाचा:

“भारत बनला आहे दक्षिण जगताचा आवाज”

पोटच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

नेहरू, इंदिरा गांधींना भारताची लोकसंख्या ही समस्या वाटत होती!

२ अब्ज डॉलरचे कर्ज ३० दिवसांत फेडा, यूएईने पाकिस्तानचे कान पिळले

मोदींनी राज्यसभा खासदार केरळचे भाजपा नेते मास्टर सदानंदन यांचा खास उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.  ते म्हणाले की, राजकारणातील विद्वेषापोटी सदानंदन यांचे दोन्ही पाय कापण्यात आले. ऐन तारुण्यात पाय कापण्यात आले. पण त्या स्थितीतही ते जीवन जगत आहेत. पण त्यांच्यावरील संस्कार इतके मोठे आहेत की, बोलण्यातही अपशब्द येत नाहीत. गर्व वाटतो त्यांचा.  त्यांचे भाषण होत होते तेव्हा कृत्रिम पाय ठेवले टेबलवर ते दृश्य देशासाठी पीडादायक आहे. इंडी अलायन्स याला जबाबदार आहे. वैचारिक असहमतीमुळे या मास्टर सदानंदन या शिक्षकाचे पाय कापले. त्याबद्दल त्यांना कोणताही खेद नाही. दुःख नाही. मी मास्टर सदानंदन यांचे अभिनंदन करतो. पण त्यांनी देशसेवेचे व्रत कायम ठेवले आज ते देशाच्या धोरणाला हातभार लावत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. असे लक्षावधी कार्यकर्त्यांकडून आम्हाला प्रेरणा मिळते.

मोदी पुढे म्हणाले की, चोरी करणे हे त्यांचे खानदानी काम आहे. त्यांनी गुजराती आडनावही चोरले. देशाचे भवितव्य उज्ज्वल बनवायचे आहे. निवडणूक हे आमचे लक्ष्य नाही तर २०४७ हे आमचे लक्ष्य आहे. देश अमर राहणार आहे. देशाच्या युवा पिढीच्या हाती समृद्ध देश देण्याचा विचार करून आम्ही चालतो आहोत. ग्रीन हायड्रोजन वर काम करत आहोत. एआय मिशनवर काम करत आहोत. एआय मिशनमधून भारत जगाला खूप काही देईल हा विश्वास आहे. भारताला कुणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. आता प्रतयेकाला भारताच्या भूमीत भविष्य दिसत आहे. जगाला विकसित भारत कळलेला आहे. आमची बस चुकू नये हे जगातील देशांना वाटते आहे. येणारा काळ संधीचा आहे नवयुवकांसाठी आहे.
नफा कमी मिळाला तरी चालेल पण क्वालिटीत तडजोड नाही. तेव्हा जे निर्णय होतात त्याचे फायदे मिळतात.
काँग्रेसचेही आभार मानतो की निदान बोलण्यापासून रोखण्यात आले होते. बोलायला लागलो की ऐकत नाही. म्हणून ते निघून गेले. हे ते कायम लक्षात ठेवतील.

Exit mobile version