दिल्लीत आप, काँग्रेसची परिस्थिती पाहून ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!

एक्सवर पोस्ट करत दोन्ही पक्षांना सुनावले

दिल्लीत आप, काँग्रेसची परिस्थिती पाहून ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना या निवडणुकीत भाजपा बाजी मारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सकाळीच दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. आप शर्यतीत असली तरी बरीच मागे राहिली आहे तर काँग्रेसला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही. लोकसभेत ‘इंडी’ आघाडीच्या नावाने एकत्र लढलेले काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष दिल्लीत मात्र स्वतंत्र निवडणूक मैदानात उतरले होते. यामुळे मते विभागली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता हीच शक्यता खरी होताना दिसत आहे. यावरुन आता इंडी आघाडीमधील मित्र पक्षांनी आप आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

मतमोजणीचे पहिले कल हाती आल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी द्विटरवरून काँग्रेस आणि आपवर जोरदार निशाणा साधला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर खोचक पोस्ट केली आहे. भाजपाने मुसंडी घेतल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाभारतातील एका साधूचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात ते साधू “जी भर के लडो, समाप्त करतो एक दुसरे को”, असा संवाद बोलताना दिसत आहेत. तर ओमर अब्दुल्ला यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “और लडो आपस मै” या कॅप्शनवरून ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेस यांच्या संघर्षाबद्दल भाष्य केले आहे.

हे ही वाचा:

रडारवरून गायब झालेल्या अलास्कातील विमानाचे अवशेष सापडले; तीन मृतदेह आढळले

दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी

पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!

सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?

दिल्लीत आपचा आणि काँग्रेसच्या झालेल्या अवस्थेवरून ‘इंडी’ आघाडीत नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. काँग्रेसने आपसोबत निवडणुकीत युती केली नाही. त्यामुळेच आपला सत्तेतून बाहेर जावं लागल्याची टीका आता इंडिया आघाडीतून केली जात आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचे कल हाती आले असून या कलानुसार भाजपा बहुमतासह आघाडीवर आहेत तर, आदमी पार्टी काही जागांवर आघाडीवर असून काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही.

Exit mobile version