देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारी महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता त्यांच्या दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापक चर्चा करतील. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देतील. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची पहिली भेट होईल. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकेकडून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
ट्रम्प आणि नरेंद्र मोदींच्या भेटीची घोषणा करताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या पहिल्या काही जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी असतील. अमेरिकेत नवीन प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत पंतप्रधानांना अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे, यावरून भारत- अमेरिका भागीदारीचे महत्त्व दिसून येते आणि अमेरिकेत या भागीदारीला मिळणाऱ्या द्विपक्षीय पाठिंब्याचेही प्रतिबिंब पडते.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी जवानांना टिपले, ७ घुसखोर ठार!
१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी
महाराष्ट्रातील वाढलेले ३९ लाख मतदार आता बिहारमध्ये जातील!
अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!
दरम्यान, ट्रम्प यांनी याआधी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आहे. शिवाय या भेटीनंतर जागतिक पातळीवर काही मोठ्या घोषणाही केल्या आहेत. आता या आठवड्यात ते वॉशिंग्टनमध्ये जपानच्या शिगेरू इशिबा यांच्याशी चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी आणी ट्रम्प यांचे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चांगले संबंध होते, त्यांनी गेल्या आठवड्यात फोनवर चर्चाही केली होती. दोन्ही नेत्यांनी इमिग्रेशन, सुरक्षा आणि व्यापारी संबंधांवर चर्चा केली, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.