राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर महत्वपूर्ण प्रश्न ठेवले आहेत. देशाचा निवडणुक आयोग जिवंत असेल, त्यांचा विविक मेला नसेल तर राहुल गांधीच्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावीत. पण निवडणूक आयोग उत्तर देणार नाही, कारण निवडणूक आयोग या सरकारची गुलामी करत आहे, असा आरोप उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी, उबाठाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज (७ फेब्रुवारी) पत्रकार परिषद पार पाडली. यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र निवडणूक आयोग, दिल्ली निवडणुक आयोगा समोर जाऊन आम्ही डोकी फोडून घेतली आहेत, पण तो मेला आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!
अमेरिकेला पाठवण्यासाठी कुटुंबाने जमीन गहाण ठेवली, ट्रॅक्टर, म्हशी विकल्या आणि …
चेंबूर माहुल गाव येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार कसे जोडले गेले?
ते पुढे म्हणाले, ३९ लाख मते आली कोठून आणि जाणार कुठे?. ते पुढे म्हणाले, आता ही मते बिहारमध्ये जातील. नावे तीच, आधार कार्ड नंबरही तेच, ही मते फिरत असतात. यातील थोडे दिल्लीमध्ये आली आहेत, महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत बघितला आहे. ही ३९ लाख मते बिहारमध्ये जातील, तेथून युपीमध्ये जातील, हा एक नवा पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नमुळे हे निवडणुका लढवतात आणि जिंकतात सुद्धा, असा दावा संजय राऊत यांनी केला.
देशात लोकशाही, संसद भवन, विधानभवने जिवंत ठेवायची असतील तर अशी प्रश्ने आम्ही नाहीत तर मिडीयाने विचारली पाहिजेत. लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने उठावे, सरकारने टाकलेली तुमच्यावरील शवपेटी उघडावी आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे संजय राऊत म्हणाले.